"बायको अशी हवी’’! अखेर नीरज चोप्राने उघड केली मन की बात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 17:37 IST2021-09-27T17:37:11+5:302021-09-27T17:37:42+5:30
Neeraj Chopra : टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यापासून भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे नाव देशभरात चर्चेत आहे. अनेकजणांकडून नीरज चोप्राच्या गर्लफ्रेंडचं नाव इंटरनेटवर सर्च करण्यात येत आहे.

"बायको अशी हवी’’! अखेर नीरज चोप्राने उघड केली मन की बात
नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यापासून भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे नाव देशभरात चर्चेत आहे. अनेकजणांकडून नीरज चोप्राच्या गर्लफ्रेंडचं नाव इंटरनेटवर सर्च करण्यात येत आहे. तर काही जण त्याच्या विवाहाविषयीच्या प्लॅनिंगविषयी जाणून घेऊ इच्छित आहेत. आतापर्यंत अनेक मुलाखतींमधून तो लग्न कधी करणार आहे, असा प्रश्न नीरज चोप्रा याला विचारण्यात आला आहे. आता अखेर नीरज चोप्रा याने या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.
नीरज चोप्रा लवकरच डान्स प्लस ६ च्या शोमध्ये दिसणार आहे. याच्या प्रोमोचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शो होस्ट करणारा राघव जुयाल याने फिमेल फॅन्सच्यावतीने नीरज चोप्राला विचारले की, नीरज चोप्रासोबत आपली कुंडली कशी मॅच करावी. हा प्रश्न ऐकून नीरज चोप्रा थोडा लाजला. त्याने हा प्रश्न हसण्यावारी नेत सांगितले की, त्याला यााबत काही माहिती नाही आहे.
मात्र प्रश्नांची ही मालिका इथेच थांबली नाही. शोचे जज पुनीत पाठक यांनी नीरजला सांगितले की, सर्व मुलींच्यावतीने मी तुला एक प्रश्न विचारतो की तुला कशा प्रकारची मुलगी आवडते, त्यावर तिथे बसलेले सर्व स्पर्धक हसू लागले आणि नीरज चोप्राच्या उत्तराची वाट पाहू लागले.
या प्रश्नाचं नीरज चोप्रा उत्तर देणार तेवढ्यात रावघ याने जेवलीनसारखी मुलगी हवीय का असा प्रतिप्रश्न केला. त्यावर नीरजने हसत हसत सांगितले की, नको, नको, एवढी उंच असेल तर काय करणार, नीरज पुढे म्हणाला की,सध्यातरी असे काही नाही. मात्र एक खेळाडू असल्याने मला वाटते की तीही खेळाडू असावी. तिचे तिच्या कामावर लक्ष असावे. तिने इतरांचा आदर करावा. तसेच ती कुटुंबाचा आदर करणारी असावी.
नीरज चोप्राला सध्या फिमेल फॅन्सकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. इंडिया टुडे मॅगझिनने आपल्या कव्हर पेजवर नीरज चोप्राला स्थान दिले होते. त्यांनी स्वत: इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून याची माहिती दिली होती. अमेरिकी अभिनेत्री समंथा स्टिफन हिनेही नीरज चोप्राच्या या पोस्टवर आपली रिअॅक्शन नोंदवली होती.