शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मला आव्हाने स्वीकारण्यास आवडतात - अजिंक्य रहाणे

By admin | Updated: June 28, 2016 18:24 IST

आगामी वेस्ट इंडिज दौ-यासाठी मी खूप उत्साहीत असून या दौ-यात उपकर्णधार म्हणून माझ्यावर कोणतेही दबाव नाही. मला आव्हान स्वीकारण्यास आवडतं आणि त्यामुळे ही माझ्यासाठी नवी संधी

मुंबई : आगामी वेस्ट इंडिज दौ-यासाठी मी खूप उत्साहीत असून या दौ-यात उपकर्णधार म्हणून माझ्यावर कोणतेही दबाव नाही. मला आव्हान स्वीकारण्यास आवडतं आणि त्यामुळे ही माझ्यासाठी नवी संधी आहे, असा आत्मविश्वास भारताचा उपकर्णधार आणि भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने व्यक्त केले. शालेय शिक्षणाच्या प्रसारासाठी झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान रहाणेने आपल्या तयारी विषयी सांगितले. विंडिज दौºयाविषयी रहाणे म्हणाला की, ‘‘हा माझा दुसरा विंडिज दौरा असून याआधी मी भारत ‘अ’ संघातून तेथे खेळलो होतो. मात्र आता सिनियर संघातून विंडिज दौ-यावर जात असून मी पुर्णपणे सज्ज आहे. या दौ-यासाठी खडतर सराव केला आहे. हा दौरा निश्चित आव्हानात्मक आहे, कारण विंडिज संघ कडवी टक्कर देण्याची क्षमता राखून आहे.’’उपकर्णधारपदाच्या जबाबदारीविषयी रहाणे म्हणाला, ‘‘या दौ-यासाठी मला उपकर्णधार म्हणून खूप चांगली जबाबदारी मिळाली आहे. मला आव्हानाला सामोरे जाऊन जबाबदारी पुर्ण करायला आवडते. उपकर्णधार म्हणून माझ्यावर कोणतेही दबाव नाही. गतवर्षीचा झिम्बाब्वे दौ-यामध्ये मी कर्णधार म्हणून खूप काही शिकलो.’’त्याचप्रमाणे,  ‘‘प्रत्येक दौरा आव्हानात्मक असतो. प्रत्येक देशात वेगवेगळे आव्हान असते. या सर्वांना सामोरे जावून तुम्ही कसे यशस्वी होतात, हे महत्त्वाचे असते. उच्च स्तरावर जाण्यासाठी प्रत्येक आव्हान पेलण्याची क्षमता राखून ठेवणे गरजेचे असते,’’ असेही रहाणेने यावेळी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)माझे वडील सुपरहिरो...शालेय शिक्षणाच्या प्रसारासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी रहाणेला ‘तुझा आवडता सुपरहिरो कोण?’ असा प्रश्न केला. यावर रहाणे म्हणाला, ‘‘माझे वडील माझे आवडते सुपरहिरो आहेत. त्यांनी माझ्या शिक्षणासाठी खूप कष्ट केले असून त्यांच्यामुळे मी शिक्षण पुर्ण करु शकतो. खेळासोबतंच शिक्षणही खूप महत्त्वाच असते हे मला त्यांनी शिकवलं.’’यावेळी विद्यार्थ्यांनी रहाणेला तुझे आवडते विषय कोणते होते? असाही प्रश्न केला. यावर रहाणेने इतिहास आणि गणित माझे आवडते विषय होते. मी गणितात ठिकठाक होतो, पण इतिहास खूप आवडायचे. मला विविध विषयांवरील पुस्तकेही वाचायला आवडतात, असे सांगितले. तसेच शाळेत मी नेहमी फर्स्ट बेंचर होतो, असेही रहाणेने आवर्जुन सांगितले.