शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

हॉलंडची भारतावर मात

By admin | Updated: December 1, 2015 03:17 IST

हॉलंडने मध्यंतरानंतर शानदार कामगिरी करीत तीन गोल नोंदविले आणि यजमान भारताला एफआयएच वर्ल्ड हॉकी लीग फायनल्सच्या ‘ब’ गटातील लढतीत सोमवारी ३-१ ने पराभूत केले.

रायपूर : हॉलंडने मध्यंतरानंतर शानदार कामगिरी करीत तीन गोल नोंदविले आणि यजमान भारताला एफआयएच वर्ल्ड हॉकी लीग फायनल्सच्या ‘ब’ गटातील लढतीत सोमवारी ३-१ ने पराभूत केले.भारताला या स्पर्धेत तीन सामन्यात दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. साखळी फेरीत भारताला एका गुणासह गटात अखेरच्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताने पहिल्या सत्रात संघर्षपूर्ण खेळ करीत हॉलंडसारख्या बलाढ्य संघाला गोलशून्य बरोबरीत रोखले. हॉलंडने ३६व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवीत खाते उघडले. वीरडन मिक वान डेरने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवीत हॉलंडला आघाडी मिळवून दिली. मिरको प्रूजसरने ४३व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पिछाडीवर पडल्यानंतर यजमान संघाने संघर्षपूर्ण खेळ केला. ४७ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर चिगलेनसाना कंगुजमने गोल नोंदवीत पिछाडी काहीअंशी भरून काढली. भारतीय संघाने त्यानंतर बरोबरी साधण्यासाठी आक्रमक खेळ केला; पण रॉयल बोवेनडर्टने ५४ व्या मिनिटाला गोल नोंदवीत भारताचा संघर्ष संपुष्टात आणला. हॉलंडने ३-१ गोल फरकाने विजयावर शिक्कामोर्तब केले.या लढतीत हॉलंडचा लिनडेन फ्लोरिस वान डेर आणि भारताच्या रूपिंदर पाल सिंग यांना धुसमुसळ्या खेळासाठी ताकीद देण्यात आली. (वृत्तसंस्था)