Hockey: Australia beat India | हॉकी : ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय
हॉकी : ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

ब्रिस्बेन : भारताच्या पुरुष हॉकी संघावर ऑस्ट्रेलियाने ४-० असा विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाकडून ब्लॅक गोवर्स आणि जेरमी हेवॉर्ड यांनी प्रत्येकी दोन गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या सामन्यात भारताकडे गोल करण्याच्या काही संधी आल्या होत्या, पण या संधीचे सोने त्यांना करता आले नाही. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारताचा यापूर्वी तिन्ही सामन्यांत एकदाही पराभव झाला नव्हता.

सामन्याच्या पाचव्या मिनिटाला भारता पेनेल्टी कॉर्नरची संधी चालून आली होती. पण ऑस्ट्रेलियाच्या बचावपटूंनी भारताचा गोल करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. सामन्याच्या १२व्या मिनिटाला हरमनप्रीत आणि नीलकांत शर्मा यांनी ऑस्ट्रेलिया गोलपोस्टवर चाल केली होती, पण यावेळीही भारतीय संघ अपयशी ठरला.

ऑस्ट्रेलियाच्या गोवर्सने सामन्याच्या १५व्या आणि ६०व्या मिनिटाला गोल केले. हेवॉर्डने सामन्याच्या २०व्या आणि ५९व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 


Web Title: Hockey: Australia beat India
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.