Hima Das wins fourth gold in 15 days, Muhammad Anas also wins top spot | Unstoppable हिमा दास; पंधरा दिवसांत सुवर्णपदकांचा चौकार
Unstoppable हिमा दास; पंधरा दिवसांत सुवर्णपदकांचा चौकार

मुंबई : सुवर्णकन्या हिमा दासने झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या स्पर्धेत आणखी एकदा अव्वल स्थान पटकावले. मागील पंधरा दिवसांतील तिचे हे चौथे सुवर्णपदक ठरले. टॅबोर अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमाने 23.25 सेकंदाची वेळ नोंदवून 200 मीटर शर्यतीचे सुवर्णपदक नावावर केले. पण, तिची ही कामगिरी सर्वोत्तम ( 23.10 सेकंद) कामगिरीच्या जवळपासचीही नव्हती. भारताच्याच व्ही के विस्मयानं 23.43 सेकंदासह रौप्यपदक जिंकले. 
 



आसाममधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हिमानं गतवर्षी 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक भरारी घेतली होती. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली होती. त्यानंतर तिच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळाले.

पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत हिमानं महिलांच्या 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. पाठीच्या दुखापतीशी संघर्ष करत असलेल्या हिमानं 23.65 सेकंदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर तिीनं कुंटो अॅथलेटिक्स स्पर्धेती 23.97 सेकंदाची वेळ नोंदवून एका सुवर्णपदकाची कमाई केली. त्यात रविवारी हिमानं 23.43 सेकंदाच्या वेळेसह आणखी एक सुवर्णपदक नावावर केले.  

आसाम महापुराच्या संकटात, 'सुवर्णकन्या' हिमा दासची मदतीसाठी साद!
आसाममध्ये महापुरामुळे 430 चौ. किमी. क्षेत्रफळाच्या काझीरंगा अभयारण्यातील 90 टक्के भागात पाणी शिरले आहे. गेंड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यातील सर्व प्राणी या जलप्रलयापासून जीव बचावण्याकरिता उंच जागी जाण्याची धडपड करीत आहेत. मात्र, या प्रयत्नात शनिवारपासून आतापर्यंत 23 प्राणी मरण पावले आहेत. आसाम आणि बिहारमध्ये पुराने कहर केला असून पूर आणि संबंधित दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 55 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरग्रस्त परिस्थितीत तेथील नागरिकांना मदत करावी असे आवाहन सुवर्णकन्या हिमा दासनं केलं आहे. तिनं तिच्या पगाराची निम्मी रक्कम पूरग्रस्तांसाठी दिली आहे.
 


Web Title: Hima Das wins fourth gold in 15 days, Muhammad Anas also wins top spot
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.