हिमा दास आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 05:57 IST2023-06-18T05:56:59+5:302023-06-18T05:57:17+5:30

२३ वर्षीय हिमाने २०१८ साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर वैयक्तिक रौप्यपदक जिंकले होते.

Hima Das out of Asian Games | हिमा दास आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर

हिमा दास आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर

नवी दिल्ली : भारताची स्टार धावपटू हिमा दास चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. हिमा दास हिला  एप्रिलमध्ये हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली.   मांडीचा त्रासही जाणवत असल्याने ती बरी झालेली नाही. भारतीय ॲथलेटिक्सचे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी याला दुजोरा दिला आहे. २३ वर्षीय हिमाने २०१८ साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर वैयक्तिक रौप्यपदक जिंकले होते. महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकणाऱ्या संघातही हिमाचा    सहभाग होता.

Web Title: Hima Das out of Asian Games