शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

'हिमा पदकासाठी धावली नव्हती, तिची स्पर्धा होती घड्याळाशी!'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 12:53 PM

जागतिक अजिंक्यपद (20 वर्षांखालील ) स्पर्धेत भारताला ट्रॅक प्रकारात पहिले सुवर्णपदक जिंकून देणा-या हिमा दासने कधी पदकासाठी सराव केला नाही, तिने नेहमी घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा केली आहे. तिच्या यशामागचे हे गुपित तिचे प्रशिक्षक निपुण दास यांनी उलगडले आहे.

गुवाहाटी - जागतिक अजिंक्यपद (20 वर्षांखालील ) स्पर्धेत भारताला ट्रॅक प्रकारात पहिले सुवर्णपदक जिंकून देणा-या हिमा दासने कधी पदकासाठी सराव केला नाही, तिने नेहमी घड्याळाच्या काट्याशी स्पर्धा केली आहे. तिच्या यशामागचे हे गुपित तिचे प्रशिक्षक निपुण दास यांनी उलगडले आहे. तिला सरावासाठी उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी  येथील इंदिरा गांधी अॅथलेटिक्स स्टेडियमवर जानेवारी 2017 मध्ये दास घेऊन आले. हिमाच्या यशामागे निपूण यांचाही मोलाचा वाटा आहे. ते म्हणाले, 'ती इतरांपेक्षा वेगळीच आहे. शिस्तबद्ध आणि मजबूत निर्धाराची. कामगिरी उंचावण्यासाठी ती मुलांबरोबर सराव करायची. सर्वोत्तम वेळ नोंदवण्यासाठी कितीही परिश्रम घेण्याची तिची तयारी असते. तिला देवाने वरदानच दिले आहे, परंतु त्याच वेळी तिने अथक परिश्रमही केले आहेत. त्यामुळे ती इतरांपेक्षा निराळी ठरत आहे. 400 मीटर धावण्याच्या पहिल्याच प्रयत्नात तिने 57 सेकंदाची वेळ नोंदवली. त्यावेळीच आपण भविष्यातील चॅम्पियन्ससोबत काम करत असल्याचे मला जाणवले.'हिमाला सरावासाठी गुवाहाटी येथे पाठवण्यासाठी वडील रंजीत यांचे मन वळवल्यानंतर निपुण यांनी इंदिरा गांधी अॅथलेटिक्स स्टेडियमच्या बाजूलाच हिमाच्या राहण्याची सोय केली. 'अॅथलेटिक्सची सुरूवात करण्यापूर्वी हिमाचा कल फुटबॉलकडे होता. ती मला नेहमी सांगायची की ती पदकासाठी नाही, तर घड्याळ्याच्या काट्याशी शर्यत करते,' असे निपुण यांनी सांगितले. ऑगस्टमध्ये होणा-या आशियाई स्पर्धेतील हिमाच्या कामगिरीबद्दल निपुण म्हणाले, हिमाकडून अपेक्षा उंचावल्या आहेत आणि ती अपेक्षांची पुर्तता करेल, अशी मला खात्री आहे. 

टॅग्स :Hima Dasहिमा दासSportsक्रीडा