हर्षदा निठवेचा दुहेरी सुवर्णवेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 18:57 IST2018-10-14T18:56:55+5:302018-10-14T18:57:48+5:30

राज्य अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत औरंगाबादच्या हर्षदा निठवेने महिलांच्या सीनियर आणि ज्युनियर अशा दोन्ही गटात सुवर्णपदक पटकाविले.

Harshada Nithave's double gold medal | हर्षदा निठवेचा दुहेरी सुवर्णवेध

हर्षदा निठवेचा दुहेरी सुवर्णवेध

ठळक मुद्देदोन्ही गटात कोल्हापूरच्या अनुष्का पाटीलने अनुक्रमे रौप्य आणि ब्राँझपदक जिंकले.

मुंबई : वरळी येथील महाराष्ट्र रायफल असोसिएशनच्या रेंजवर सुरू असलेल्या ३५व्या राज्य अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात औरंगाबादच्या हर्षदा निठवेने महिलांच्या सीनियर आणि ज्युनियर अशा दोन्ही गटात सुवर्णपदक पटकाविले. या दोन्ही गटात कोल्हापूरच्या अनुष्का पाटीलने अनुक्रमे रौप्य आणि ब्राँझपदक जिंकले. १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात युवा गटात पुण्याच्या श्रेया बदाडेने ५६५ गुणांसह सुवर्णपदक पटकाविले. ५० मीटर फ्री पिस्तुल प्रकारात मुंबई उपनगरच्या अनिकेत खिडसे व ज्युनियर गटात पुण्याच्या कुणाल ससेने सुवर्णपदकावर नाव कोरले. शनिवारी रात्री झालेल्या पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुलमध्ये मुंबई उपनगरच्या रोनक पंडितने सुवर्ण जिंकले होते तर ज्युनियर आणि युवा गटात कोल्हापूरच्या तेजस ढेरेने दुहेरी चमक दाखविली. 

निकाल : १० मीटर एअर पिस्तुल (महिला) : १) हर्षदा निठवे (औरंगाबाद, २३३),  २) अनुष्का पाटील (कोल्हापूर, २३१.४), ३) मनिषा राठोड (नाशिक, २०९.४). ज्युनियर गट : १) हर्षदा निठवे (औरंगाबाद, ५७१), २) श्रेया बदाडे (पुणे, ६५६), ३) अनुष्का पाटील (कोल्हापूर, ५६०), १० मीटर एअर पिस्तुल युवा : १) श्रेया बदाडे (पुणे, ५६५), २) आकांक्षा दीक्षित (सातारा, ५६०), ३) अनुष्का पाटील (कोल्हापूर, ५६०). ५० मीटर फ्री पिस्तुल (पुरुष) : १) अनिकेत खिडसे (मुंबई उपनगर, ५४१), २), महेश घाडगे (सातारा, ५३५), ३) हरेश कांबळे (मुंबई उपनगर, ५३३). ज्युनियर : १) कुणाल ससे (पुणे, ५३२), २) सुशांत कवण (पुणे, ५२८), ३) अजिंक्य चव्हाण (सातारा, ५०३).

Web Title: Harshada Nithave's double gold medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.