शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

हरमनप्रीत खेळणार बिग बॅश लीगमध्ये

By admin | Updated: June 25, 2016 02:45 IST

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौर यावर्षी डिसेंबर महिन्यात आॅस्ट्रेलियात होणाऱ्या महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल) ट्वेंटी-२0 स्पर्धेत सिडनी थंडर्स संघाकडून खेळणार आहे

धर्मशाला : भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौर यावर्षी डिसेंबर महिन्यात आॅस्ट्रेलियात होणाऱ्या महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल) ट्वेंटी-२0 स्पर्धेत सिडनी थंडर्स संघाकडून खेळणार आहे. या स्पर्धेत खेळणारी ती पहिली महिला भारतीय क्रिकेटर आहे.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी शुक्रवारी येथे बोर्डाच्या बैठकीच्या अखेरच्या दिवशी हरमनप्रीतने सिडनी थंडर्ससोबत करार करण्याविषयी दुजोरा दिला. बीसीसीआयने गेल्या महिन्यात परदेशातील लीगमध्ये खेळण्यासाठी भारतीय महिला खेळाडूंना परवानगी दिली होती. मंडळाच्या या निर्णयानंतर हरमनप्रीत ही परदेशातील लीगशी जुळली गेलेली पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.अष्टपैलू हरमनप्रीत कौरला बिग बॅशमध्ये अनेक संघांनी आपल्या संघात समावेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात लीगच्या पहिल्या पर्वातील विजेता संघ सिडनी थंडर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात हरमनप्रीतला आपल्या संघात घेण्यासाठी चुरस होती.भारतीय संघात अनेक चांगले खेळाडू आहेत, त्यात हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमूर्ती यांचा समावेश आहे. आपण भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीलादेखील बिग बॅशमध्ये खेळताना पाहू इच्छितो, असे पहिल्या पर्वातील विजेता संघ सिडनी थंडर्सची कर्णधार अ‍ॅलेक्स ब्लॅकवेलने म्हटले होते. आमच्या संघात एका परदेशी खेळाडूची जागा आहे आणि ती जागा हरमनप्रीत कौर भरून काढू शकते, असे एलिस पेरीनेदेखील म्हटले होते. (वृत्तसंस्था)