शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

स्कॉटलंडचा शानदार विजय

By admin | Updated: February 11, 2015 01:37 IST

मॅट माचनच्या (१०३) शतकी खेळीनंतर अ‍ॅलेसडेयर इवांस व माजिद हक यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर स्कॉटलंडने विश्वकप स्पर्धेच्या सराव सामन्यात

सिडनी : मॅट माचनच्या (१०३) शतकी खेळीनंतर अ‍ॅलेसडेयर इवांस व माजिद हक यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर स्कॉटलंडने विश्वकप स्पर्धेच्या सराव सामन्यात मंगळवारी आयर्लंडचा १७९ धावांनी पराभव केला. आयर्लंड संघ २०१९च्या विश्वकप स्पर्धेत अव्वल १० संघांमध्ये स्थान निश्चित करण्याची मागणी करीत आहे. पण, स्कॉटलंडने मोठ्या फरकाने विजय मिळविल्यामुळे आयर्लंडकडे अद्याप अव्वल १०मध्ये स्थान मिळविण्याची पात्रता नसल्याची प्रचिती आली. पुढील विश्वकप स्पर्धेत १० संघ सहभागी होणार असून, त्यात जगातील अव्वल ८ वन-डे संघाचा समावेश राहणार असून, उर्वरित दोन संघ पात्रता फेरीनंतर निश्चित होतील. स्कॉटलंडने निर्धारित ५० षटकांत ६ बाद २९६ धावांची मजल मारली आणि प्रतिस्पर्धी आयर्लंडचा डाव २७ षटकांत ११७ धावांत गुंडाळला. मॅट माचनने १०८ चेंडूंना सामोरे जाताना १०३ धावांची खेळी केली. त्यात ६ चौकार व ४ षटकारांचा समावेश आहे. कर्णधार प्रेस्टन मोंमसेनने ७० चेंडूंमध्ये पाच चौकार व १ षटकारासह ५६ धावा फटकाविल्या. रिची बॅरिंगटनने (५२ धावा, ४० चेंडू, २ चौकार, २ षटकार) अर्धशतकी खेळी केली. आयर्लंडतर्फे सलामीवीर पॉल स्टर्लिंगने ३७ व कर्णधार विलियम पोटरफिल्डने २३ धावा फटकाविल्या. सलामीला ५७ धावांची भागीदारी झाल्यानंतर आयर्लंड संघाने ६० धावांत १० विकेट गमाविल्या. इवांसने ५ षटकांत १७ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले, तर हकने ४ षटकांत ९ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाजांना माघारी परतवले. विश्वकप स्पर्धेत आयर्लंडचा ‘ब’ गटात समावेश आहे. या गटात दक्षिण आफ्रिका, भारत आणि पाकिस्तान यांच्यासारख्या संघांचा समावेश आहे. स्कॉटलंड संघ ‘अ’ गटात असून, यात सहयजमान आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्या व्यतिरिक्त इंग्लंड व श्रीलंका हे संघ आहेत. (वृत्तसंस्था)