माझ्यातील क्षमतेला ग्रासकोर्ट पूरक - क्विटोव्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 07:45 AM2021-06-29T07:45:55+5:302021-06-29T07:46:12+5:30

विम्बल्डन कोर्ट गालिचा - क्विटोव्हा

Grasscourt complements my ability - Quitova | माझ्यातील क्षमतेला ग्रासकोर्ट पूरक - क्विटोव्हा

माझ्यातील क्षमतेला ग्रासकोर्ट पूरक - क्विटोव्हा

Next
ठळक मुद्देदुसरा मानांकित रशियाचा दानील मेदवेदेव म्हणाला, मालोर्का टूर्नामेंट जिंकल्याने माझा आत्मविश्वास निश्चित वाढला असून येथे जिंकण्याचा स्वाभाविकच प्रयत्न करेन

उदय बिनिवाले
लोकमत न्यूज नेटवर्क
लंडन :  ‘ग्रासकोर्ट माझे अतिशय आवडते आहे. डावखुरी आणि आक्रमक खेळाडू असल्यामुळे माझ्यातील क्षमतेला ग्रासकोर्ट पूरक असल्याचे मत झेकोस्लोव्हाकियाची टेनिसपटू पेट्रा क्विटोव्हा हिने व्यक्त केले.

दुसरा मानांकित रशियाचा दानील मेदवेदेव म्हणाला, मालोर्का टूर्नामेंट जिंकल्याने माझा आत्मविश्वास निश्चित वाढला असून येथे जिंकण्याचा स्वाभाविकच प्रयत्न करेन. जोकोविचने इतिहास रचला असून तो प्रत्येक वेळेस काही खास अणि विशेष खेळ करतो व प्रतिस्पर्ध्यावर दबाव येतो.तिसरा मानांकित ग्रीसचा स्टेफनोस सिटसिपासने ग्रासकोर्टवर अनेक सामने न खेळल्याचे सांगितले.  परंतु अनुभव अणि शारीरिक क्षमतेच्या जोरावर जबरदस्त खेळ करू, असा आत्मविश्वास दाखविला. नोव्हाक जोकोविच अतिशय बलाढ्य खेळाडू असून सर्वश्रेष्ठ खेळाडूंमध्ये त्याची गणना होईल, असे गौरवोद्‌गार काढले. आता आम्ही तरुण खेळाडू त्याला थोपवण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी पुष्टीही सिटसिपासने  जोडली.  विम्बल्डनच्या पूर्वसंध्येला झालेल्या संवाद कार्यक्रमात क्विटोव्हा म्हणाली, ‘ग्रासकोर्ट मला अतिशय प्रिय आहे. या कोर्टवरील हालचाली मला भावतात, अगदी आपुलकीचे वाटते.’ दोन वेळा विम्बल्ड’ जिंकलेली पेट्रा पुढे म्हणाली, ‘येथील कोर्ट म्हणजे गालिचा असल्याचा आभास होतो.’

Web Title: Grasscourt complements my ability - Quitova

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tennisटेनिस