शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

आवडते काम मिळाले : द्रविड

By admin | Updated: June 8, 2015 00:52 IST

भविष्यातील पिढीच्या क्रिकेटपटूंना तयार करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास नेहमीच सज्ज होतो आणि आता जबाबदारी मिळाल्यानंतर सर्वोत्तम देण्याची तयारी आहे अशी प्रतिक्रिया राहुल द्रविडने व्यक्त केली.

नवी दिल्ली : भविष्यातील पिढीच्या क्रिकेटपटूंना तयार करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास नेहमीच सज्ज होतो आणि आता जबाबदारी मिळाल्यानंतर सर्वोत्तम देण्याची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया भारत ‘अ’ व अंडर-१९ संघाचा नवनियुक्त प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केली. द्रविड म्हणाला, ‘माझ्या आवडीचे हे क्षेत्र आहे. अनेक क्रिकेटपटूंसाठी हा महत्त्वाचा काळ असतो. मला त्यांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे. युवा खेळाडूंना माझ्या अनुभवाचा लाभ मिळेल.’वरिष्ठ संघाच्या प्रशिक्षकपदाचा दावा मजबूत करण्याची संधी म्हणून या जबाबदारीचा विचार करीत नसल्याचे द्रविडने सांगितले. सीनिअर संघाचे प्रशिक्षकपद माझे लक्ष्य नसल्याचे द्रविड म्हणाला. त्याने सांगितले की, ‘युवा खेळाडूंसोबत काम करण्याची आवड आहे. राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकाच्या तुलनेत याची व्याप्ती कमी आहे. ही भूमिका बजावण्यासाठी मी सज्ज आहे.’नवनियुक्त सल्लागार समितीकडून मदतीची अपेक्षा आहे. या समितीमध्ये माझे सहकारी खेळाडू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश आहे. युवा खेळाडूंसाठी उपयुक्त ठरणारी रणनीती तयार करण्यावर भर राहील. नव्या दमाचे क्रिकेटपटू पुढे येण्याासठी अनुकूल वातावरण तयार करणार असून त्यांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न राहील, असेही द्रविड म्हणाला. युवा खेळाडूंच्या मदतीसाठी सचिन, सौरव व लक्ष्मण यांचे सहकार्य अपेक्षित असून गरज भासल्यास भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांच्यासोबत संपर्क साधण्यासाठी संकोच बाळगणार नसल्याचे द्रविडने यावेळी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)पीटरसन म्हणतो चांगला निर्णय1 राहुल द्रविडकडे भारत ‘अ’ आणि अंडर-१९ संघंच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाची भारतासह जगात प्रशंसा होत आहे. इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हिन पीटरसनने हे चांगले पाऊल असल्याचे म्हटले आहे.

2 पीटरसनने टिष्ट्वट केले की, ‘बीसीसीआयने राहुल द्रविडला अंडर-१९ आणि ‘अ’ संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. हे चांगले पाऊल आहे. युवा खेळाडूंना द्रविडच्या मार्गदर्शनाखाली सराव करताना किती आनंद मिळले, हे सांगता येणे कठीण आहे. राहुलचा स्वभाव प्रशंसेस पात्र आहे. त्याला आधुनिक क्रिकेटची चांगली जाण असून जगभरातील खेळपट्ट्यांवर त्याने धावा वसूल केल्या आहेत. तो खडतर प्रतिस्पर्धी आहे. वेल डन बीसीसीआय.’3 १६४ कसोटी सामन्यांत १३२८८ व ३४४ वन-डे सामन्यांत १०८८९ धावा फटकावणाऱ्या द्रविडला राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा प्रस्ताव देण्यात आला होता, पण त्याने कौटुंबिक कारणामुळे हा प्रस्ताव नाकारला.’