शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अलविदा ग्लास्गो, आता भेट गोल्ड कोस्टमध्ये !

By admin | Updated: August 4, 2014 03:03 IST

स्कॉटलंडमधील सर्वांत मोठे शहर असलेल्या ग्लास्गोमधील २० व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या ११ दिवसांच्या यशस्वी आयोजनाची आज, रविवारी शानदार समारंभात सांगता झाली.

ग्लास्गो : स्कॉटलंडमधील सर्वांत मोठे शहर असलेल्या ग्लास्गोमधील २० व्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या ११ दिवसांच्या यशस्वी आयोजनाची आज, रविवारी शानदार समारंभात सांगता झाली. आता खेळाडूंना २०१८ मध्ये आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये होणाऱ्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. २३ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत ग्लास्गोमध्ये आयोजित २० व्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७१ देशांच्या ४९४७ अ‍ॅथलिट्सनी २६१ सुवर्णपदकांसाठी झुंज दिली. इंग्लंडने २८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आॅस्ट्रेलियाला धक्का देत पदकतालिकेत अव्वल स्थान पटकाविले.पाचव्या स्थानावरील भारताच्या खात्यावर १५ सुवर्णपदकांसह एकूण ६४ पदकांची नोंद आहे. यावेळी एकूण ३७ देशांनी पदकतालिकेमध्ये स्थान मिळविले. या स्पर्धेतील अखेरच्या शर्यतीत पुरुषांच्या सायकलिंग रोड रेसमध्ये वेल्सच्या गॅरेंट थॉमसने सुवर्ण जिंकले, तर महिला विभागात हा मान इंग्लंडच्या लिजी आर्मिटस्टेडने मिळविला. आता पुढील स्पर्धा आॅस्ट्रेलियामध्ये होणार आहे. २०१८ मध्ये ४ ते १५ एप्रिल या कालावधीत गोल्ड कोस्ट शहरात २१ वी राष्ट्रकुल स्पर्धा होईल. (वृत्तसंस्था)