शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

नेशन्स कपमध्ये गोव्याच्या आश्रेयाचा ‘पंच’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 21:06 IST

महिला ज्युनियर बॉक्सरला ४ सुवर्णपदके: १२ पदकांसह भारत उपविजेता

पणजी : सर्बिया येथे झालेल्या तिसऱ्या नेशन्स चषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या ज्युनियर मुलींनी पदकांची लयलूट केली. यामध्ये गोव्याची आश्रेया नाईक ही सुद्धा चमकली. आश्रेयाने कांस्यपदक पटकाविले. ६३ किलो गटात तिने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र, अत्यंत चुरशीच्या सामन्यात तिला सर्बियाच्या अलेक्झांड्रा तेपवाक हिच्याकडून ३-२ ने पराभवाचा सामना करावा लागला. भारताच्या तमन्ना (४८ किलो), आंबेशेरी देवी (५७), प्रीती दहिया (६० किलो) यांनी सुवर्णपदक पटकाविले. हरियाणाची तमन्ना ही सर्वाेत्कृष्ट बॉक्सर ठरली. तमन्नाने ४८ किलो गटात सुवर्णमय कामगिरी केली. तिने रशियाच्या अ‍ॅलेना ट्रेमासोवा हिचा ५-०ने पराभव केला. भारतीय संघ स्पर्धेत दुसºया स्थानावर राहिला. हरियाणाच्या प्रियंका हिने जबरदस्त प्रदर्शन करीत रशियाच्या ओल्गा पेट्राश्को हिचा ५-० ने पराभव केला. ५० किलो गटात, कर्नाटकच्या अंजू देवी हिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ती रशियाच्या अनास्तासिया किरिएन्कोकडून पराभूत झाली. ५२ किलो गटात महाराष्ट्राची रायझिंग स्टार सिमरन वर्मा हिला रशियाच्या वेलेरिया लिन्कोवाकडून ५-० ने पराभूत व्हावे लागले. दरम्यान, या स्पर्धेत २० देशांतील १६० बॉक्सर्सनी भाग घेतला. भारताच्या संघात एकूण १३ खेळाडूंचा समावेश होता. भारतीय संघाने मिळवलेली १२ पदके या स्पर्धेतील मोठे यश ठरले.

टॅग्स :boxingबॉक्सिंगIndiaभारतgoaगोवा