शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

गंगपूर, साईची आगेकूच

By admin | Updated: April 23, 2015 02:45 IST

राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत गंगपूर ओडिशाने भोपाळला पराभूत करीत उपांत्य फेरीत आपली जागा जवळपास निश्चित केली आहे. स्पोर्ट अथॉरीटी आॅफ इंडियाने

पुणे : राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत गंगपूर ओडिशाने भोपाळला पराभूत करीत उपांत्य फेरीत आपली जागा जवळपास निश्चित केली आहे. स्पोर्ट अथॉरीटी आॅफ इंडियाने (साई) ओडिशाला बरोबरीत रोखत आगेकूच केली. झारखंड, मध्यप्रदेश हॉकी अ‍ॅकॅडमीने आपापल्या गटातील प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलात ‘अ’ गट हॉकी अजिंक्य स्पर्धा सुरु आहे. स्पर्धेतील ‘ब’ गटात गंगपूर ओडिशाने भोपाळचा ५-२ असा सहज पराभव करीत आगेकूच केली. गंगपूरकडून प्रताप लाक्रा (४, ४२ मि), अमरदीप एक्का (२९ मि), दीपक लाक्रा (४३ मि), रोशन मिंझ (५५ मि) यांनी गोल करीत संघाला शानदार विजय मिळवून दिला. भोपाळकडून आफताब खान (२६ मि), मोबीन उर रेहमान (४५ मि) गोल करण्यात यशस्वी झाले. मध्यंतरापर्यंत गंगपूरकडे २-१ अशी आघाडी होती. याच गटात झारखंडने पिछाडीवरुन इंडियन युनिव्हर्सिटीज संघाला २-१ अशी मात दिली. सामन्याच्या ३० व्या मिनिटास युनिव्हर्सिटीज संघाच्या हरसाहिब सिंग याने गोल करीत संघाला आघाडी मिळवून देत पूर्वाधातील खेळावर वर्चस्व राखले. उत्तरार्धात झारखंडच्या दीपक कुजुर (३६ मि), अरविंद कुजुर (५४ मि) यांनी गोल करीत संघाला विजय मिळवून दिला. स्पर्र्धेच्या ‘अ’ गटात मध्यंतरापर्यंत ३-१ अशी भक्कम आघाडी असतानाही ओडिशाला साई विरुद्ध ३-३ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले. ओडीशाकडून दिलीप टोप्पो (१५ मि), ईर्शाद मिर्झा (२२ मि), अभिषेक सिंग (२५ मि) यांनी, तर साई संघाकडून जगत नचाप्पा (२६ मि), पवन कुमार (३९ मि), बसवराज (५४ मि) गोल करण्यात यशस्वी ठरले. याच गटात मध्यप्रदेश हॉकी अ‍ॅकॅडमीने विकास चौधरी (२० व ५९ मि), निक्की कौशल (४६ मि) यांच्या गोलच्या जोरावर आंध्रप्रदेशवर ३-० असा सहज विजय मिळविला.