अभिमानास्पद! मध्य रेल्वेच्या ४ महिला खेळाडूंची टोकियो ऑलिम्पिकसाठी हॉकी संघात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 17:59 IST2021-06-18T17:57:33+5:302021-06-18T17:59:38+5:30

टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील चार खेळाडूंची राष्ट्रीय महिला हॉकी संघात निवड झाली आहे.

four women from central railway mumbai division selected for hockey team for tokyo olympics | अभिमानास्पद! मध्य रेल्वेच्या ४ महिला खेळाडूंची टोकियो ऑलिम्पिकसाठी हॉकी संघात निवड

अभिमानास्पद! मध्य रेल्वेच्या ४ महिला खेळाडूंची टोकियो ऑलिम्पिकसाठी हॉकी संघात निवड

डोंबिवली : टोकियो ऑलिम्पिक २०२१ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मध्य रेल्वेच्यामुंबई विभागातील चार खेळाडूंची राष्ट्रीय महिला हॉकी संघात निवड झाली आहे. मध्य रेल्वेसाठी हे अभिमानास्पद आहे कारण टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणा-या भारतीय महिला हॉकी संघातील १६ सदस्यांच्या संघात मध्य रेल्वेच्या ४ खेळाडूंच्या नावाची  घोषणा करण्यात आली आहे.  १६ सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघातील १३ खेळाडू भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात तिकीट तपासणी संवर्गात काम करणारे चारही खेळाडू मोनिका मलिक हेड टीसी, सुश्री वंदना कटारिया हेड टीसी, सुशिला चानू पुखरांबम् हेड टीसी आणि स्टँड-इन गोल कीपर सुश्री रजीनी एतिमारपु हेड टीसी यांची भारतीय ऑलिम्पिक महिला हॉकी संघात निवड झाली आहे.  या खेळाडू गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वेकडून सराव आणि खेळत आहेत.   यांच्या प्रशिक्षक हेलन मेरी (अर्जुन पुरस्कार प्राप्त) आणि श्रीमती सरिता ग्रोव्हर असून त्या मध्य रेल्वेत कार्यरत आहेत आणि राष्ट्रीय हॉकीपटू होते असेही जनसंपर्क विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
 

Web Title: four women from central railway mumbai division selected for hockey team for tokyo olympics