अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 10:27 IST2024-06-03T10:24:46+5:302024-06-03T10:27:07+5:30

सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे.

Former Indian tennis player Sania Mirza has made a post on social media  | अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट

अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून आहे, त्यामुळे संयम ठेवा; Sania Mirza ची पोस्ट

Sania Mirza Post : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झाला आहे. तेव्हापासून सानिया चर्चेत आहे. तिच्या या नात्याबद्दल सानियाने जाहीरपणे भाष्य करणे टाळले आहे. पण ती वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून नकळत याचे संकेत देत असते. आता तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवत प्रेरणादायी मेसेज दिला आहे. सानिया मिर्झानेटेनिस खेळात भारताला एक ओळख निर्माण करून दिली. पण २०१० मध्ये तिला प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले होते. हा तो काळ होता जेव्हा सानियाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केले होते.

खरे तर पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने तिसरे लग्न केले आहे. शोएब आणि सानिया यांना एक मुलगा देखील आहे. शोएब आणि सानिया यांच्यातील हे नाते १४ वर्षांनंतर संपले. सानिया तिचा मुलगा इझान मिर्झा मलिकसोबत दुबईमध्ये शोएबपासून लांब राहत आहे. शोएबची तिसरी पत्नी सना जावेद हिचे देखील या आधी लग्न झाले आहे. सना तिच्या पडद्यावरील आयुष्याशिवाय वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. घटस्फोटानंतर सानिया मिर्झा कधीही उघडपणे काहीच बोलली नाही. मात्र, ती सोशल मीडियावर सक्रिय असून वेगवेगळ्या पोस्ट करत असते.

सानियाची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे. तिने एक पोस्ट तिच्या स्टोरीवर ठेवली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, अल्लाह तुमच्या सर्व समस्या जाणून असतो. त्यामुळे संयम ठेवा. सानिया नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते. 

शोएब मलिकचे तिसरे लग्न 
शोएब मलिकने सानियापासून विभक्त होऊन अभिनेत्री सना जावेदशी लग्न केले. शोएबची पत्नी सनाचा जन्म २५ मार्च १९९३ रोजी सौदी अरेबिया येथे झाला. कराची विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर तिने २०१२ साली 'शहर-ए-झात' मधून पाकिस्तानी सिनेसृष्टीत पदार्पण केले. काला दोरीया, मुश्त-ए-खाक, डंक, रूसवाई, दार खुदा, आणि इंतजार सारख्या नाटकांमध्ये तिने कमालीची भूमिका साकारली आहे. सनाचे हे पहिले लग्न नसून तिचे याआधीही लग्न झाले आहे. २०२० साली उमैर जसवालसोबत सनाने निकाह केला होता. उमैर हा पाकिस्तानातील प्रसिद्ध गायक आहे.

Web Title: Former Indian tennis player Sania Mirza has made a post on social media