शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

फिक्सिंगचा डाग

By admin | Updated: April 8, 2015 15:40 IST

आयपीएल २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावत सचिन तेंडूलकरला गोड निरोप दिला. पण या पर्वात मुंबई इंडियन्सच्या विजयापेक्षा चर्चा होती ती स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या खेळाडूंची.

आयपीएल २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सने विजेतेपद पटकावत सचिन तेंडूलकरला गोड निरोप दिला. पण या पर्वात मुंबई इंडियन्सच्या विजयापेक्षा चर्चा होती ती स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या खेळाडूंची. आयपीएल २०१३ मध्ये एस.श्रीशांत, अजित चंडेला व अंकित चव्हाण या तिघांना स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केल्याने आयपीएलची प्रतिष्ठा धूळीस मिळाली. 
खेळाडूंवर कोट्यावधींच्या बोली लागत असतानाच जास्त पैशांच्या हव्यासापोटी खेळाडू फिक्सिंगमध्येही गुंतले. राजस्थान रॉयल्सचे एस.श्रीशांत, अंकित चव्हाण व अजित चंडिला या तिघांना दिल्ली पोलिसांनी मुंबईतील उच्चभ्र हॉटेलमधून अटक केली.  आयपीएलमधील दोन सामन्यांमध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी पोलिसांनी बुकिंनाही अटक केली. याशिवाय राजस्थान रॉयल्सचे मालक राज कुंद्रा, चेन्नई सुपर किंग्जचे गुरुनाथ मयप्पन, अभिनेता विंदू दारा सिंग हे तिघे बेटिंग प्रकरणामुळे गोत्यात आले. मयप्पन व विंदूदारा सिंग या दोघांना तुरुंगाची हवा खावी लागली. तर राज कुंद्रा यांची कसून पोलिस चौकशी झाली. चेन्नई सुपर किंग्जची मालकी इंडिया सिमेंट्सकडे असून इंडिया सिमेंट्स प्रमुख एन. श्रीनिवासन आहेत. विशेष म्हणजे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असताना श्रीनिवासन यांनी आयपीएलचा संघ विकत घेणे वादग्रस्त ठरले. यात भर म्हणजे मयप्पन हे श्रीनिवासन यांचे जावई आहेत. त्यामुळे बेटिंग प्रकरणामुळे चेन्नई सुपर किंग्ज वादाच्या भोव-यात सापडली. सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या चौकशी समितीने १३ जणांची चौकशी केली असून कोर्टाकडे अहवाल सादर केला आहे. यामध्ये काही खेळाडूंचाही समावेश असल्याचे समजते. हे प्रकरण सद्या न्यायप्रवीष्ट आहे.