शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

FIFA World Cup, Rainbow T-Shirt: इंद्रधनुष्याचा टी-शर्ट घातलेल्या अमेरिकन पत्रकाराला सुरक्षारक्षकांनी मॅच बघण्यापासून रोखलं, जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 18:00 IST

इतकेच नव्हे तर त्या पत्रकाराला टी-शर्ट काढायलाही सांगितला

Rainbow T-Shirt: कतारमध्ये सुरू झालेला FIFA World Cup 2022 सध्या विविध मुद्द्यांनी गाजतोय. सुरूवातीला वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाईक यांना आमंत्रित केल्याने वाद उपस्थित झाला होता. त्यानंतर, इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात इराणच्या संघाने आपल्याच सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी सामन्याआधी राष्ट्रगीत गायले नाही. पाठोपाठ अर्जेंटिनाच्या एका महिला पत्रकाराची रिपोर्टिंग करताना बॅग चोरीला गेली आणि त्यानंतर आता एका अमेरिकन पत्रकारानेही असाच एक खळबळजनक दावा केला आहे.

एका अमेरिकन पत्रकाराचे म्हणणे आहे की त्याने सोमवारी कतारमधील फुटबॉल वर्ल्ड कप स्टेडियममध्ये प्रवेश केला, तेव्हा त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने जो टी-शर्ट घातला होता त्यावरून सारा वादंग झाला. त्यानंतर सामना पाहायला जायचे असेल तर टी-शर्ट काढून जा, असा अजब सल्ला त्याला देण्यात आला होता.

आत जायचं असेल तर टी-शर्ट काढून जा!

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, प्रसिद्ध क्रीडा पत्रकार ग्रँट वाहल (Grant Wahl) याने त्याच्या वेबसाइटवरून अनुभव सांगितला. विश्वचषकाच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी त्याला अमेरिका विरूद्ध वेल्स सामन्यात घुसू दिले नाही. अहमद बिन अली स्टेडियम येथे हा सामना सुरू असताना त्याला प्रवेश दिला गेला नाही. याउलट त्याला शर्ट काढण्यास सांगण्यात आले. त्याने याबाबत ट्विट केल्यावर त्याचा फोनही काढून घेण्यात आल्याचे त्याने सांगितले. वाहलने ट्विटरवर लिहिले की, 'मी ठीक आहे, पण त्याची काहीच गरज नव्हती.'

टी-शर्ट का काढायला सांगितला?

अमेरिकन पत्रकाराने आपल्या देशाच्या धोरणांनुसार उदात्त विचारसरणीचा टी-शर्ट घातला होता. पण कतार मधील सुरक्षारक्षकांना त्यावरचा विचार अयोग्य वाटल्याने हा प्रकार घडला. पत्रकाराने एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायाच्या समर्थनार्थ इंद्रधनुष्याचा टी-शर्ट घातला होता. कतारमध्ये समलैंगिक संबंध (Same Sex Relations) बेकायदेशीर मानले जातात. त्यामुळे त्याला अडवण्यात आले आणि टी-शर्ट काढायला सांगितले.

नंतर सुरक्षारक्षकांनी मागितली माफी

काही वेळीने सुरक्षा कमांडर नंतर त्याच्याकडे पोहोचले आणि त्यांनी पत्रकाराची माफी मागितली व त्याला स्टेडियममध्ये जाऊ दिले. नंतर त्याची आंतरराष्ट्रीय फुटबॉल प्रशासकीय संस्था FIFA च्या प्रतिनिधींकडून माफी मागितली गेली.

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२AmericaअमेरिकाLGBTएलजीबीटीJournalistपत्रकार