शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

खेळामध्ये सर्वांना समान संधी मिळणे आवश्यक

By admin | Updated: May 6, 2016 05:05 IST

भारताला क्रीडाक्षेत्रात प्रगती करायची असेल, तर खेळाचे लोकशाहीकरण व्हायला हवे. संधी आणि सुविधांचे समान व्यासपीठ सर्वांना उपलब्ध व्हायला हवे. त्यासाठी प्रचंड प्रयत्नांची गरज आहे

पुणे : भारताला क्रीडाक्षेत्रात प्रगती करायची असेल, तर खेळाचे लोकशाहीकरण व्हायला हवे. संधी आणि सुविधांचे समान व्यासपीठ सर्वांना उपलब्ध व्हायला हवे. त्यासाठी प्रचंड प्रयत्नांची गरज आहे, असे व्यक्तव्य आॅलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंग याने केले. कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय स्पोटर््स एक्स्पोच्या (पीआयएसई) उद््घाटन समारंभात अध्यक्षीय भाषणात गगनने क्रीडाक्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजनाबाबत विचार मांडले. या वेळी भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज व आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याचीही विशेष उपस्थिती होती. यावेळी रोहितने फीत कापून औपचारिक उद््घाटन केले. गगन पुढे म्हणाला, ‘‘माझ्या देशासाठी पदक जिंकणे माझे कर्तव्य आहे. आॅलिम्पिक स्पर्धेत पुन्हा एकदा पदक जिंकण्याचे माझे स्वप्न मी पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार आहे.’’ काही दिवसांपूर्वी केंद्रिय क्रीडामंत्र्यांनी रियो आॅलिम्पिक स्पर्धेत आपण १० पदके जिंकू, अशी अपेक्षा दर्शविली आहे. याबाबत गगन म्हणाला, की ‘‘हे लक्ष्य साध्य करणे संभव आहे की नाही, यापेक्षा त्यासाठी केले जाणारे प्रयत्न व घेण्यात येणारे कष्ट हे महत्त्वाचे. नक्कीच जर सरकार यावर एवढा खर्च करीत असेल, तर त्यांनी एवढी अपेक्षा करणे काहीच गैर नाही; पण हे संभव आहे का? हे लक्ष्य साध्य हाऊ शकते; पण कधी? जेव्हा भारतातील क्रीडाक्षेत्राचे लोकशाहीकरण होईल तेव्हा. जेव्हा संधी आणि सुविधांचे समान व्यासपीठ सर्वांना उपलब्ध होईल आणि जेव्हा भारतीय क्रीडाक्षेत्रात अधिक खेळाडू सहभागी होतील तेव्हाचे हे साध्य होईल. केवळ एलिट खेळाडूंवर लक्ष केंद्रित करुन चालणार नाही. भविष्यातील पदक विजेते खेळाडू घडविण्यासाठी निधी व वेळ खर्च करावा लागेल आणि मुख्य म्हणजे संयम ठेवावा लागेल.’’माझ्या कारकिर्दीत पुण्याचे एक वेगळे स्थान आहे. मी पुण्यात १४ व १७ वर्षांखालील क्रिकेट खेळलो आहे. महत्त्वाचे म्हणजे १७ वर्षांखालील भारतीय संघात माझी निवड पुण्यातंच झाली होती. एक खेळाडू म्हणून चांगली, उत्कृष्ट कामगिरी करणे सोपे नसते. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि आम्ही तेच करीत असतो. मी क्रिकेटबाबत म्हणालो, कारण मी क्रिकेटर आहे. मी असे अनेक खेळाडू पाहतो, की ज्यांचे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असते. त्यासाठी त्यांना आणि रियो आॅलिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला खूप शुभेच्छा. - रोहित शर्मा