शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

इवल्याशा बेटावरील इसोवची फिनिक्स भरारी, भारताचे पहिले जागतिक पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 2:55 PM

स्वित्झर्लंड येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद सायकल शर्यतीत अंदमान-निकोबार बेटावरील इसोव अल्बान या युवा खेळाडूने भारतीयांना अभिमानास्पद वाटेल अशी फिनिक्स भरारी घेतली.

मुंबई - स्वित्झर्लंड येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद सायकल शर्यतीत अंदमान-निकोबार बेटावरील इसोव अल्बान या युवा खेळाडूने भारतीयांना अभिमानास्पद वाटेल अशी फिनिक्स भरारी घेतली. अंगावर शहारे आणणाऱ्या शर्यातीत इसोवने भारताला जागतिक स्पर्धेतील पहिलेवहिले पदक जिंकून दिले. अवघ्या 0.017 सेकंदाच्या फरकाने इसोवला सुवर्णपदकाने हुलकावणी दिली, परंतु त्याचे हे रौप्यपदक अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

कनिष्ठ गटातील जागतिक क्रमावारीत अव्वल स्थानावर असलेल्या अंदमान-निकोबारच्या या खेळाडूने पुरूषांच्या केइरीन प्रकारात स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रौप्यपदक जिंकले. झेक प्रजासत्ताकच्या जाकूब स्टॅस्टनीने 200 मीटरची ही शर्यत 10.851 सेकंदात पूर्ण केली. इसोवने कझाकस्तानच्या अँड्री चूगायवर मात केली.  मलेशियात नुकत्याप पार पडलेल्या आशियाई ट्रॅक अजिंक्यपद स्पर्धेत इसोवने तीन सुवर्णपदक पटकावली होती.तो म्हणाला,'मला आघाडीवर राहायचे होते आणि कोणाशीही टक्कर टाळायची होती. येथे विजयाची खात्री होती, परंतु सुवर्णपदक हुकले. त्यामुळे थोडासा आनंद कमी झाला आहे.'शर्यतीची चुरस अनुभवण्यासाठी व्हिडीओ पाहा.. 

टॅग्स :Esow Albanइसोव अल्बानSwitzerlandस्वित्झर्लंड