इंग्लंडचा तुफानी ‘स्ट्रोक’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2016 03:02 IST2016-01-04T03:02:05+5:302016-01-04T03:02:05+5:30
अष्टपैलू बेन स्टोक्सने कसोटी इतिहासातील दुसरे वेगवान द्विशतक ठोकताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी २५८ धावा कुटल्या.

इंग्लंडचा तुफानी ‘स्ट्रोक’!
केपटाऊन : अष्टपैलू बेन स्टोक्सने कसोटी इतिहासातील दुसरे वेगवान द्विशतक ठोकताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी २५८ धावा कुटल्या. त्याने जॉनी बेअरस्टोसह (नाबाद १५०) ३९९ धावांची भागीदारी केली. या जोरावर इंग्लंडने पहिला डाव ६ बाद ६२९ धावांवर घोषित केला. यानंतर यजमानांची दिवसअखेर २ बाद १४१ अशी अवस्था करुन इंग्लंडने वर्चस्व गाजवले. स्टोक्सने १९८ चेंडंूत ३० चौकार व ११ षट्कारांसह २५८ धावा केल्या. बेअरस्टोने १८ चौकार व दोन षट्कार ठोकत १९१ चेंडंूत १५० धावा केल्या. डावात सर्वाधिक षट्कार मारण्याच्या यादीत स्टोक्स सयुंक्तरीत्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. इंग्लंडने दुसऱ्या दिवशी ५ बाद ३१७ धावांवरुन सुरुवात केली. बेअरस्टो व स्टोक्स यांनी सहाव्या विकेटसाठी ३९९ धावांची भागीदारी केली.