शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंड

By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST

विश्वकप सराव : ख्रिस व्होक्सचा भेदक मारा

विश्वकप सराव : ख्रिस व्होक्सचा भेदक मारा
इंग्लंडचा विंडीजविरुद्ध दमदार विजय
सिडनी : वेगवान गोलंदाज ख्रिस व्होक्सच्या अचूक मार्‍याच्या जोरावर वेस्ट इंडिजचा डाव माफक धावसंख्येत गुंडाळणार्‍या इंग्लंडने विश्वकप सराव सामन्यात सोमवारी जवळजवळ २७ षटके शिल्लक राखून ९ गड्यांनी विजय मिळविला.
नाणेफेकीचा कौल वगळता या लढतीत वेस्ट इंडीज संघासाठी काहीच मनासारखे घडले नाही. व्होक्सने १९ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेत विंडीजचा प्रथम फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सिद्ध केले. विंडीजचा डाव २९.३ षटकांत १२२ धावांत संपुष्टात आला. इंग्लंडने २२.५ षटकांत एक गडी गमावत सहज विजय मिळविला.
नवा कर्णधार व काही अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत विश्वकप स्पर्धेसाठी येथे दाखल झालेल्या विंडीज संघातील फलंदाजांना वेगवान व उसळी घेणार्‍या खेळप˜ीवर ताळमेळ साधता आला नाही. दोनदा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणार्‍या विंडीज संघातील केवळ चार फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. त्यात लेंडल सिमन्सने सर्वाधिक ४५ धावा फटकाविल्या. याव्यतिरिक्त ड्वेन स्मिथ (२१), डॅरेन सॅमी (१२) आणि मर्लोन सॅम्युअल्स (१०) यांना दुहेरी धावसंख्या गाठता आली.
इंग्लंडतर्फे व्होक्सव्यतिरिक्त स्टिव्हन फिनने ३४ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. ख्रिस जॉर्डन, जेम्स ट्रेडवेल व रवी बोपारा यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी परतवले. इंग्लंडने प्रमुख गोलंदाज जेम्स ॲन्डरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांना गोलंदाजी दिली नाही. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोईन अलीने (४३ चेंडू, ४६ धावा, ९ चौकार) आक्रमक खेळी केली. मोईन अली बाद झाल्यानंतर इयान बेल (३५) आणि जेम्स टेलर (२५) यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. विंडीजतर्फे एकमेव बळी केमार रोचने घेतला.
इंग्लंडला आता ११ फेब्रुवारी रोजी याच मैदानावर पाकिस्तानविरुद्ध, तर विंडीजला त्यानंतरच्या दिवशी स्कॉटलंडविरुद्ध सराव सामना खेळावा लागणार आहे. (वृत्तसंस्था)