शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
4
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
5
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
6
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
7
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
8
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
9
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
10
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
11
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
12
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
13
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
14
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
15
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
16
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
17
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
18
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
19
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
20
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

पात्रता शर्यतीकडे लक्ष कायम

By admin | Updated: June 6, 2016 02:30 IST

भारताची जोना मुर्मु, आश्विनी अकुंजी, अनिल्डा थॉमस आणि एम. आर. पूवम्मा यांचा समावेश असलेल्या महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले संघाने पीटीएस अ‍ॅथलेटिक्स ग्रांप्री स्पर्धेत

सॅमोरिन : भारताची जोना मुर्मु, आश्विनी अकुंजी, अनिल्डा थॉमस आणि एम. आर. पूवम्मा यांचा समावेश असलेल्या महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले संघाने पीटीएस अ‍ॅथलेटिक्स ग्रांप्री स्पर्धेत ३१.३९ सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकत रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याची आशा कायम राखली आहे. या कामगिरीनंतर रिले संघाला आॅलिम्पिकसाठी पात्रता गाठण्याचे दोन पर्याय आहेत. बहामाच्या नसाऊमध्ये गेल्या वर्षी आयएएएफ विश्व रिलेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या अव्वल आठ संघांचा थेट आॅलिम्पिकसाठी प्रवेश निश्चित झाला आहे. उर्वरित आठ स्थानांसाठी १ जानेवारी २०१५ ते ११ जुलै २०१६ या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राष्ट्रीय संघांच्या कामगिरीच्या आधारावर संघांची निवड करण्यात येईल. भारताच्या राष्ट्रीय संघाने सर्वोत्तम कामगिरी २०१५ मध्ये ३ मिनिट २९.०८ सेकंद (जिश्ना मॅथ्यू, टिंटू लुका, देबश्री मुजुमदार व पूवम्मा) बीजिंग विश्वचॅम्पियनशिपमध्ये नोंदवली होती. शनिवारी भारतीय संघाने (३ मिनिट ३१.३९ सेकंद) नोंदवलेल्या कामगिरीचा विचार करता विश्व रिले रँकिंगमध्ये भारतीय संघ १५ व्या स्थानी आहे. रिले रँकिंग रिओ आॅलिम्पिकसाठी तयार करण्यात आली आहे. त्याची सरासरीवेळ ३ मिनिट ३०.२४ सेकंद अशी आहे. रशियन महासंघावर सध्या आयएएएफने डोपिंग प्रकरणामुळे बंदी घातली आहे. त्यांना पुनरागमन करण्याची संधी आहे. रशियन संघ (३ मिनिट २४.२९ सेकंद) सरस सरासरीच्या आधारावर भारताला एका स्थानाने पिछाडीवर ढकलू शकतो. जर्मनी संघ १६ व्या स्थानी होता. भारताने शनिवारी रात्री अव्वल १६ मध्ये स्थान मिळवल्यामुळे जर्मनी संघाची घसरण झाली आहे. जर्मनी संघाकडे मायदेशात आणि शेजारी राष्ट्रांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये चांगली संधी आहे. भारतीय संघ आता युरोपमध्ये होणाऱ्या स्पर्धेत सातत्याने सहभागी होणार असून त्यांना कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे. त्यांना अव्वल १६ मधील स्थान कायम राखावे लागणार आहे. कारण अव्वल १६ संघांना आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. (वृत्तसंस्था)