नवी दिल्ली : सलग दोन सामन्यात धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या दीपक हुड्डाने आपल्या यशाचे श्रेय संघाचा मार्गदर्शक राहूल द्रविड आणि इतर सहकाऱ्यांने दिले आहे. पत्रकार परिषदेत हुड्डा म्हणाला, राजस्थान रॉयल्सने माझ्यावर विश्वास दाखविला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी शेवटपर्यंत खेळू शकतो, असे द्रविड मला सांगत होते. त्यांचा हा विश्वास आज मी सार्थ करू शकलो, याबद्दल आनंद आहे. सामन्याबद्दल बोलताना हुड्डा म्हणाला, मैदानावर आम्ही आमचा नैसर्गिक खेळ करण्याचे ठरविले होते. भागिदारी उभी करण्याचे ध्येय होते. मोठे फटके मारता आले नाहीत तर फक्त स्ट्राईक रोटेट कर, असे मला अजिंक्य रहाणेने सांगितले होते, पण चेंडू बघून मी फटके खेळत गेलो आणि आज चांगली खेळी करण्यात यशस्वी झालो.
यशाचे श्रेय द्रविडला : हुड्डा
By admin | Updated: April 13, 2015 03:42 IST