दिनेश कांबळी ठरला ‘महाराष्ट्र-श्री’ चा मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 19:40 IST2018-04-09T19:40:03+5:302018-04-09T19:40:03+5:30
‘मिस महाराष्ट्र’ या किताबाला गवसणी घातली ती ठाण्याच्या मुब्बा शेरा शेखने. २७ जिल्ह्यंमधील २७२ खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत पालघरने सांघिक विजेतेपद पटकावले, तर मुंबईला उपविजेतेपदाचा मान मिळाला.

दिनेश कांबळी ठरला ‘महाराष्ट्र-श्री’ चा मानकरी
मुंबई : महाराष्ट्र शरीरसौष्ठव असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत मुंबईच्या दिनेश कांबळीने बाजी मारली. कोपरगाव येथे रंगलेल्या या स्पर्धेत दिनेशने ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा मानाता किताब पटकावला. त्याचबरोबर ‘मिस महाराष्ट्र’ या किताबाला गवसणी घातली ती ठाण्याच्या मुब्बा शेरा शेखने. २७ जिल्ह्यंमधील २७२ खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत पालघरने सांघिक विजेतेपद पटकावले, तर मुंबईला उपविजेतेपदाचा मान मिळाला. कोल्हापूरच्या दुर्गा प्रसाद दासरीने सर्वोत्तम सादरीकरणाचे व मुंबईच्या हरमीत सिंगने सर्वोत्तम प्रगतीकारक शरीरसौष्ठवपटूचे बक्षीस मिळवले.
स्पर्धेचा निकाल
५५ किलो : १. नितीन बेहरीकर (पालघर), २. जहीर अहमद (नाशिक), ३. वीर अय्याज अमीन (औरंगाबाद); ६० किलो : १. मोहम्मद बेपारी (सांगली), २. कश्यप खंडागळे (पुणे), ३. जयेंद्र अंजर्लेकर (मुंबई); ६५ किलो : १. दिनेश कांबळी (मुंबई), २. गणेश नाईकनवरे (पुणे), ३. मुश्रीफ खान (नाशिक); ८५ किलो : १. दिग्विजय खोडके (कोल्हापूर), २. वैभव मरगंटेवार (जालना), ३. जितेंद्र ढगाळे (मुंबई); ८५ किलो वरील : १. हरमीत सिंग (मुंबई), २. कैय्युम शेख (पुणे), ३. भारत पवार (नगर).
मिस महाराष्ट्र : १. मुब्बा शेरा शेख (प. ठाणे), २. मिथाली नायर (पालघर) ३. पलक मोरे (पालघर).
मेन्स फिजिक : अमित आगरे (पालघर), २. नेहाज शेख (पुणे), ३. अजय शेट्टी (पालघर).