शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याची आशा धोनीच्या चमत्कारावर

By admin | Updated: May 3, 2016 03:47 IST

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक सफल कर्णधार, आयपीएलमधील उत्कृष्ट संघाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार अशी बिरुदावली गेली आठ वर्षे मिरविणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला

नवी दिल्ली : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक सफल कर्णधार, आयपीएलमधील उत्कृष्ट संघाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार अशी बिरुदावली गेली आठ वर्षे मिरविणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला आयपीएलच्या नवव्या सत्रात मात्र आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याचा नवा संघ रायझिंग पुणे सुपरजायंट्स खेळाडूंच्या दुखापती, खराब कामगिरी यामुळे पराभवाच्या गर्तेत सापडला आहे. या संघाला चेन्नई सुपरकिंग्जसारखे बलाढ्य करण्यात कर्णधार धोनीला यश येईल का, हा खरा प्रश्न आहे.महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या आठ सत्रापर्यंत चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार होता, परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपावरून हा संघ आयपीएलमधून निलंबित करण्यात आला. पुणे आणि गुजरात हे दोन संघ यंदाच्या आयपीएलमध्ये नव्याने सामील करण्यात आले. यापैकी पुण्याची धुरा धोनीकडे, तर गुजरातची धुरा त्याचाच एकेकाळचा सहकारी सुरेश रैनाकडे आहे. रैना नवीन जबाबदारीत प्रचंड यशस्वी ठरताना दिसतोय, तर धोनी मात्र कमालीचा अयशस्वी होत आहे. आठ सामन्यांत दोन विजय आणि सहा पराजय हे त्याच्या नावापुढे शोभून दिसत नाहीत. आता या संघाला पुढे यायचे असेल तर एखाद्या चमत्काराचीच गरज आहे. पुण्याच्या संघात धोनीकडे इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हीन पीटरसन, दक्षिण आफ्रिकेचा टष्ट्वेंटी-२० कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ असे आणि स्वत: धोनी असे चार-चार कप्तान होते, परंतु पुणे संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. केव्हीन पीटरसन दुखापतीमुळे संघातून पहिल्यांदा बाहेर पडला. त्यानंतर मिशेल मार्शही दुखापतग्रस्त झाला आणि आता डू प्लेसिस आणि स्मिथ हे दोघेही जायबंदी झाले आहेत. अशा परिस्थितीत धोनीपुढे मर्यादित मॅनपॉवरमध्ये चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे.पुणे संघाने स्पर्धेची सुरुवात धडाकेबाज केली होती. गतविजेत्या मुंबई इंडियन्सला त्यांनी ९ विकेट्सनी धुतले होते. (वृत्तसंस्था)त्यानंतर मात्र त्यांचा पराभवाचा सिलसिला सुरू झाला, अपवाद फक्त हैदराबाद सनरायझर्सचा. या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार पुण्याला विजय मिळाला. आता धोनीचा संघ एक जरी सामना हरला, तर त्यांचा प्लेआॅफचा मार्ग खडतर होईल. आॅस्ट्रेलियावरील ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या, आशिया चषक विजेत्या आणि विश्वचषकात भारताला सेमी फायनलपर्यंत घेऊन जाणाऱ्या धोनीवर त्याचे नशीब असे रुसेल, याचा अंदाज कोणालाच आला नसेल, हे मात्र निश्चित! (वृत्तसंस्था)