शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

का झाली धोनीची कर्णधारपदावरून हकालपट्टी?

By admin | Published: April 10, 2017 3:28 PM

त्यामुळे कारकिर्दीत पहिल्यांदाच कर्णधारपदावरून हकालपट्टीची नामुष्की धोनीवर

सागर सिरसाट / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - इंडियन प्रिमियर लिगच्या 10 व्या सत्राला सुरूवात होण्यापूर्वी पुणे  सुपरजायंट्स संघाच्या कर्णधारपदावरून महेंद्र सिंग धोनीची हकालपट्टी करण्यात आली . त्याच्याऐवजी ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथकडे संघाची धूरा देण्याचा निर्णय पुणे संघाचे मालक हर्ष गोयंका यांनी जाहीर केला. त्यामुळे कारकिर्दीत पहिल्यांदाच कर्णधारपदावरून हकालपट्टीची नामुष्की धोनीवर आली. भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधाराची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या होत्या. धोनीच्या खराब फॉर्मशिवाय हर्ष गोयंकासोबत त्याचे संबंध चांगले नसल्याचीही जोरदार चर्चा होती. 
 
आता आयपीएलला सुरूवात झाल्यानंतर पुण्याचे मालक हर्ष गोयंका या चर्चेत आगीत तेल ओतण्याचं काम करत आहेत. पुणे संघाच्या झालेल्या दोन्ही सामन्यानंतर त्यांनी धोनीवर अप्रत्यक्षपणे टीका केली. पंजाबविरूद्ध झालेल्या पराभवानंतर त्यांनी आपल्या संघातील खेळाडूंच्या स्ट्राइक रेटचा फोटो ट्विट केला. यामध्ये अप्रत्यक्षपणे संघात धोनीचा सर्वात खराब स्ट्राइक रेट असल्याचं त्यांनी म्हटलं. ट्विटमध्ये जरी त्यांनी धोनीचं नाव घेतलं नसलं तरी हे ट्विट धोनीसाठीच होतं हे धोनीच्या चाहत्यांनी हेरलं आणि गोयंका यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू केला. 
 
आतापर्यंत मनोज तिवारी, अजिंक्य रहाणे आणि डॅनियल ख्रिस्टियन यांचा सर्वात जास्त स्ट्राइक रेट असल्याचं त्यांनी ट्वीट केलं. त्यासोबत त्यांनी आकडेवारीचा एक फोटो अपलोड केला आहे. त्यामध्ये धोनी पाचव्या नंबरवर असून केवळ 73 इतका त्याचा स्ट्राइक रेट दिसत आहे.
यापुर्वी पुण्याच्या मुंबईवरील पहिल्या विजयानंतरही गोयंका यांनी धोनीच्या चाहत्यांचा रोष ओढवून घेतला होता. मॅच विनिंग खेळी करणा-या स्मिथचं त्यांनी कौतूक केलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी, "स्मिथने दाखवून दिलं कोण आहे जंगलचा राजा, आपल्या कामगिरीने त्याने धोनीला पूर्णतः झाकोळलं,  स्मिथची कर्णधारपदी निवड करण्याचा निर्णय योग्यच होता" असं ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतरही धोनीच्या चाहत्यांनी गोयंका यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. वाढती टीका पाहून गोयंका यांनी ते ट्विट नंतर डिलीट केलं.
 
या सर्व घटनाक्रमामुळे गोयंका आणि धोनीचे संबंध चांगले नसल्याची पुन्हा चर्चा सुरू आहे. गोयंका आणि धोनीमध्ये सर्वकाही आलबेल नसून , धोनीसोबत असलेल्या कटू संबंधांमुळेच धोनीची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
 
हा सर्व वाद पाहता, धोनीची कर्णधारपदावरून हकालपट्टी का केली या प्रश्नाचं थेट उत्तर गोयंका यांनी कधी दिलं नाही पण आता ट्विटरद्वारे धोनीला का हटवलं याचं ते उत्तर देत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.