नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने बांगलादेशमध्ये १८ जूनपासून सुरू होत असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी राजधानीच्या मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर शनिवारी चार तास नेटचा जोरदार सराव केला़ भारतीय संघ बांगलादेशाच्या फातुल्लामध्ये सुरु असलेल्या एकमेव कसोटीमध्ये जेथे पावसाच्या व्यत्ययापासून संघर्ष करीत आहे तर दुसरीकडे धोनी सकाळी सात वाजता नॅशनल स्टेडियमवर पोहोचून जवळपस चार तासांपर्यंत आपले सर्वात जुने कोच एम़ पी़ सिंग यांच्यासोबत घाम येईपर्यंत सराव केला आणि मनमोकळेपणाने चर्चा केली़
धोनीने केला नॅशनल स्टेडियमवर सराव
By admin | Updated: June 14, 2015 01:50 IST