शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

धोनीला दुखापत

By admin | Updated: February 23, 2016 03:17 IST

आशिया कप स्पर्धा प्रारंभ होण्यास ४८ तासांचा अवधी शिल्लक असताना सोमवारी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सरावादरम्यान पाठीच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास जाणवला

फातुल्ला : आशिया कप स्पर्धा प्रारंभ होण्यास ४८ तासांचा अवधी शिल्लक असताना सोमवारी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सरावादरम्यान पाठीच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास जाणवला. बीसीसीआयने तातडीने यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेलला पर्यायी व्यवस्था म्हणून संघासोबत जुळण्यास सांगितले. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर म्हणाले, सरावादरम्यान धोनीच्या पाठीला दुखापतीचा त्रास जाणवला. निवड समितीने आशिया कप स्पर्धेसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून पार्थिव पटेलची निवड केली. आशिया कप स्पर्धेत भारताला सलामी लढत २४ फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध खेळावी लागणार आहे. गुजरातचा ३० वर्षीय यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने भारतातर्फे २० कसोटी, ३८ वन-डे आणि दोन टी-२० सामने खेळले आहेत. २१ फेब्रुवारी २०१२ रोजी तो भारतातर्फे अखेरचा वन-डे सामना खेळला होता. त्याने भारतातर्फे अखेरचा टी-२० सामना ३१ आॅगस्ट २०११ रोजी खेळला होता. दरम्यान, दुखापतीतून न सावरल्यामुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आशिया कप स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याच्या स्थानी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ रविवारी बांगलादेशमध्ये डेरेदाखल झाला आणि सोमवारी धोनीच्या दुखापतीचे वृत्त धडकले. धोनीच्या दुखापतीचे स्वरुप अद्याप स्पष्ट झाले नाही, पण पर्याय म्हणून पार्थिवचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कर्णधाराबाबत जोखिम पत्करता येणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. धोनीला आशिया कप स्पर्धेत सलामी लढतीत विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. २७ फेब्रुवारी रोजी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीपूर्वी धोनी फिट होईल, अशी आशा आहे.