शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

धवन, विजय यांच्या मानांकनात सुधारणा

By admin | Updated: June 16, 2015 02:09 IST

आॅस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव्हन स्मिथ याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

दुबई : आॅस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव्हन स्मिथ याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यानंतर अशी कामगिरी करणारा स्मिथ सर्वांत युवा फलंदाज ठरला आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली अव्वल दहांच्या यादीतून बाहेर गेला असून, शिखर धवन, मुरली विजय व अजिंक्य रहाणे यांनी आपल्या कसोटी क्रमवारीत चांगलीच सुधारणा केली आहे. आयसीसीने नुकतीच खेळाडूंची नवीन क्रमवारी जाहीर केली. बांगलादेशाबरोबरील एकमेव कसोटी सामन्यानंतर धवन, विजय व रहाणे यांनी आपल्या क्रमवारीत सुधारणा केली. विजयच्या क्रमवारीत ३ अंकांनी सुधारणा झाली असून, तो २०व्या स्थानी आहे. धवनने १५ अंकांनी झेप घेऊन ४५व्या स्थानी मजल मारली आहे. बांगलादेशाविरुद्धच्या सामन्यात शतकापासून वंचित राहिलेला रहाणे याने ४ अंकांची सुधारणा करून कारकिर्दीतील सर्वोच्च २२व्या स्थानावर झेप घेतली. कोहलीच्या क्रमवारीत एका अंकाने घसरण झाली असून, तो ११व्या स्थानी गेला आहे. किंग्स्टन कसोटीत आॅस्ट्रोलियाने २७७ धावांनी विजय मिळविला होता. त्यात आपल्या दुहेरी शतकापासून वंचित राहिलेल्या स्मिथने श्रीलंकेचा कुमार संघकारा, दक्षिण आफ्रिकेचे एबी डिव्हिलियर्स व हाशिम आमला यांना मागे टाकून अव्वल स्थानी झेप घेतली. या कसोटीत स्मिथने १९९ व नाबाद ५४ धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे स्मिथ तेंडुलकरनंतर फलंदाजीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी गेलेला दुसरा युवा खेळाडू ठरला आहे. तेंडुलकर १९९९मध्ये अव्वल स्थानी होता, त्या वेळी त्याचे वय २५ वर्षे व २७९ दिवस होते. आत्ता स्मिथचे वय २६ वर्षे व १२ दिवस आहे. स्मिथ आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचणारा २३वा फलंदाज ठरला आहे. कर्णधार मायकल क्लार्क जानेवारी २०१३मध्ये अव्वल स्थानावर होता. मात्र, असे असले तरी संघकाराला पाकिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेत अव्वल कामगिरी करून पहिल्या स्थानावर येण्याची चांगली संधी आहे. स्टीव्ह वॉ सर्वाधिक ९४ कसोटी सामन्यांपर्यंत अव्वल स्थानी होते. तर, महान फलंदाज डॉन ब्रॅडमन ६,३२० दिवस अव्वल स्थानी होते. स्मिथला जमैकातील कामगिरीसाठी ४९ गुण मिळाले; त्यामुळे तो पहिल्यांदाच ९०० गुण तोडण्यात यशस्वी झाला. त्याचे आता ९१३ गुण झाले असून, तो सर्वाधिक कसोटी गुणांक मिळविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत २४व्या स्थानी आहे. गोलंदाजीत भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विन, बांगलादेशाचा साकीब अल हसन यांच्या क्रमवारीत एका अंकाची सुधारणा झाली आहे. दोघे अनुक्रमे १२व्या व १६व्या स्थानी आहेत.