गतविजेत्या फ्रान्सला रेल्वेचा धक्का
By Admin | Updated: June 17, 2015 01:48 IST2015-06-17T01:48:32+5:302015-06-17T01:48:32+5:30
जर्मनी (नुर्नबर्ग) येथे झालेल्या जागतिक युएसआयसी टेनिस रेल्वे गेम्स स्पर्धेत भारतीय रेल्वेने गतविजेत्या फ्रान्सचा ३-१ ने पराभव करीत विजेतेपद पटकावले.

गतविजेत्या फ्रान्सला रेल्वेचा धक्का
पुणे : जर्मनी (नुर्नबर्ग) येथे झालेल्या जागतिक युएसआयसी टेनिस रेल्वे गेम्स स्पर्धेत भारतीय रेल्वेने गतविजेत्या फ्रान्सचा ३-१ ने पराभव करीत विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत आॅस्ट्रिीया, जर्मनी, बेल्जियम, बल्गेरिया, झेक रिपब्लिक, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, इटली, हॉलंड, रशिया, स्वित्झर्लंड हे देश सहभागी झाले होते. भारतीय संघाने स्वित्झर्लंड, स्लोव्हाकिया, रशिया, हॉलंड यांना पराभूत करीत उपांत्यफेरी गाठली. आॅस्ट्रिायाला नमवून भारतीय रेल्वेने अंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम फेरीत उदय के रेड्डीने लुईस मॉंटेरोचा सुपर टायब्रेकमध्ये २-६, ६-३, ११-९ असा पराभव केला. फ्रान्सच्या थिबॉल्ट ब्रोअर्टने सौरव सुकुलचा सुपर टायब्रेकमध्ये ६-४, ५-७, १०-८ असा पराभव करुन १-१ अशी बरोबरी साधली. यानंतर नितिन किर्तनेने सायरील थिएरेचा ६-२, ६-४ असा धुव्वा उडवून संघाला २-१ असे आघाडीवर नेले. पीसी विग्नेशने ख्रिस्तोफ ग्युएनला ७-६ (११-९), ७-५ असे नमवत संघाला विजयी केले.