मडगाव : मुंबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयएफबीबी डायमंड चषक शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय संघात गोव्यातर्फे प्रतिनिधीत्व करणाºया देबोराह अलेरा डायस हिने महिलांच्या बिकिनी गटात सुवर्णपदक पटकाविले. गोमंतकीय महिला शरिरसौष्ठवपटूने या गटात मिळवलेले हे पहिलेच सुवर्णपदक ठरले. आपण सुवर्णपदक प्राप्त करणार असा विश्वास तिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला होता. अंधेरी येथील होली फॅमिली स्कूल मैदान येथे ही स्पर्धा सुरू आहे. देबोराह अलेरा डायस ही बिकीनी गटात भारतीय संघातून या स्पर्धेत सहभागी झालेली गोव्याची एकमेव स्पर्धक आहे. विशेष म्हणजे राज्य पातळीवर तिने कोणत्याही मोठ्या कामगिरीची नोंद केलेली नाही. प्रथमच ती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करीत आहे. स्पर्धेत तिने अंतिम फेरीतही प्रवेश केला.
देबोराह डायस ठरली ‘गोल्डन वूमन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 20:13 IST
आयएफबीबी डायमंड शरीरसौष्ठव स्पर्धेत शानदार प्रदर्शन
देबोराह डायस ठरली ‘गोल्डन वूमन’
ठळक मुद्देगोमंतकीय महिला शरिरसौष्ठवपटूने या गटात मिळवलेले हे पहिलेच सुवर्णपदक ठरले.