'दंगल गर्ल' गीता फोगट झाली आई; घरी आला नवा पाहुणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 14:02 IST2019-12-25T14:00:04+5:302019-12-25T14:02:08+5:30

गीताने ट्विट केलेल्या फोटोत तिच्यासह पती पवन कुमार आणि त्यांचे  बाळ दिसत आहे.

'Dangal Girl' Geeta phogat blessed with baby boy | 'दंगल गर्ल' गीता फोगट झाली आई; घरी आला नवा पाहुणा

'दंगल गर्ल' गीता फोगट झाली आई; घरी आला नवा पाहुणा

मुंबई : 'दबंग गर्ल' या नावाने प्रसिद्ध असलेली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा फडकवणारी महिला कुस्तीपटू गीता फोगट आई झाली आहे. आपल्या ट्विटरवरून गीताने ही माहिती शेअर केली आहे.

गीताने मंगळवारी एका मुलाला जन्म दिला आहे. गीताने ट्विट केलेल्या फोटोत तिच्यासह पती पवन कुमार आणि त्यांचे  बाळ दिसत आहे. ट्विटमध्ये गीताने लिहिले आहे की, " हॅलो बॉय, या विश्वात तुझे स्वागत आहे. तुम्ही आम्हाला प्रेम आणि आशिर्वाद द्या. हा आनंदाचा क्षण मी शब्दांत व्यतित करू शकत नाही."


गीताने २०१० साली झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक जिंकवून दिले होते. गीता आणि तिचे वडिल महावीर यांच्या आयुष्यावर दंगल हा सिनेमा आला होता. या सिनेमामध्ये महावीर यांची भूमिका आमिर खानने साकारली होती. या सिनेमानंतर गीता आणि तिच्या कुटुंबियांना जबरदस्त प्रसिद्धी मिळाली.

Web Title: 'Dangal Girl' Geeta phogat blessed with baby boy