Cristiano Ronaldo : 'आई-वडील म्हणून सर्वात मोठे दु:ख...', फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 08:27 AM2022-04-19T08:27:41+5:302022-04-19T08:27:55+5:30

Cristiano Ronaldo: पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या नवजात बाळाचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः रोनाल्डोने काल सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली.

Cristiano Ronaldo: Star footballer Cristiano Ronaldo's newborn baby dies | Cristiano Ronaldo : 'आई-वडील म्हणून सर्वात मोठे दु:ख...', फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचे निधन

Cristiano Ronaldo : 'आई-वडील म्हणून सर्वात मोठे दु:ख...', फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नवजात मुलाचे निधन

googlenewsNext

Cristiano Ronaldo : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटूख्रिस्तियानो रोनाल्डो(Cristiano Ronaldo) याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोनाल्डोच्या नवजात बाळाचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः रोनाल्डोने काल(दि.18) सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली. रोनाल्डो आणि त्याची पत्नी जॉर्जिना रॉड्रिग्ज यांनी सोमवारी जुळ्या मुलांना जन्म दिला, मात्र प्रसूतीदरम्यान तिच्या एका नवजात मुलाचा मृत्यू झाला. 

ऑक्टोबरमध्ये रोनाल्डोने जॉर्जिनासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून ते लवकरच आई-बाबा होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. त्यांनी पोस्ट शेअर करत जुळे होणार असल्याचे सांगितले होते. पण, आता या जुळ्यापैकी मुलाचा मृत्यू झाला आहे, तर त्यांची नवजात मुलगी सुखरूप आहे.

रोनाल्डोची पोस्ट:-

काय म्हणाला रोनाल्डो 
रोनाल्डोने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, ''आम्हाला संगताना अतिशय दु:ख होतंय की, आमच्या नवजात मुलाचे निधन झाले आहे. हे आई-वडील म्हणून सर्वात मोठे दु:ख आहे. आमच्या मुलीच्या जन्माने हे दु:ख सहन करण्याची ताकद मिळतेय. आम्ही सर्व डॉक्टरांचे आभार मानतो.' 

रोनाल्डोचे कुटुंब
रोनाल्डोला आधीच दोन मुले आणि दोन मुली आहेत. 2010 मध्ये ते ख्रिस्तियानो जूनियरचा पिता झाला. त्यानंतर 9 जून 2017 रोजी रोनाल्डोने जुळ्या मुलांना जम्न दिला. मुलगी इवा आणि मुलगा माटेओ असे त्यांचे नाव असून, ते दोघे सरोगसीद्वारे जन्मले. त्यानंतर, 12 नोव्हेंबर 2017 रोजी रोनाल्डोची जोडीदार जॉर्जिना हिने मुलगी आलियाना मार्टिनाला जन्म दिला.
 

Web Title: Cristiano Ronaldo: Star footballer Cristiano Ronaldo's newborn baby dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.