'कोर्ट'चा वाद, सायनाची राष्ट्रीय स्पर्धेतून माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2019 21:22 IST2019-02-14T21:21:42+5:302019-02-14T21:22:00+5:30

... त्यामुळे सायना या स्पर्धेत खेळायला तयार नसल्याचे म्हटले जात आहे.

'Court' dispute, Saina withdraws from national championship | 'कोर्ट'चा वाद, सायनाची राष्ट्रीय स्पर्धेतून माघार

'कोर्ट'चा वाद, सायनाची राष्ट्रीय स्पर्धेतून माघार

नवी दिल्ली : भारताची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने राष्ट्रीय स्पर्धेतून माघार घेतल्याचे वृत्त नुकतेच आले आहे. 'कोर्ट'चा वाद असल्यामुळे सायना या स्पर्धेत खेळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला आसाम येथे आजपासून सुरुवात झाली. सायना दुखापतीनंतर या स्पर्धेमध्ये उतरणार होती. सायना या स्पर्धेच्या कोर्टवर उतरली आणि तिला ते योग्य असल्याचे वाटले नाही. बॅडमिंटनचे कोर्ट योग्य नसल्याचे सांगत सायनाने या स्पर्धेत खेळायला नकार दिला.

सायनाने नकार दिल्यावर भारतीय बॅडमिंटन महासंघाचे पदाधिकारी तिला भेटले. याबाबत अधिकाऱ्यांनी सायनाशी चर्चा केली. सायना या स्पर्धेत खेळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

गेल्यावर्षी सायनाच्य पायाला दुखापत झाली होती. त्यानंतर सायना भारतामध्ये या स्पर्धेत उतरणार होती. पण बॅडमिंटन कोर्टचा दर्जाचा चांगला नसल्यामुळे सायनाने राष्ट्रीय स्पर्धेत खेळायला नकार दिला. आता यापुढे ऑल इंग्लंड बॅडमिंटन ही मानाची स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत खेळता यावे, यासाठी सायनाला जोखीम उचलायची नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे सायना या स्पर्धेत खेळायला तयार नसल्याचे म्हटले जात आहे.

वर्षाअखेर पीबीएल खेळल्याने शरीरावर विपरीत परिणाम - सायना
‘वर्षभर विविध स्पर्धांमध्ये व्यस्त राहिल्यानंतर वर्षाअखेर प्रीमियर बॅडमिंटन लीग खेळल्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही,’ असे स्पष्ट मत स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यक्त केले.
सायना म्हणाली,‘प्रत्येक खेळाडू शंभर टक्के योगदान देऊन जिंकू इच्छितो. मात्र, पीबीएलचे आयोजन वर्षाअखेर होत असल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ही सर्वांत कठीण स्पर्धांपैकी एक असल्याने कुठल्याही खेळाडूंसाठी या स्पर्धेत खेळणे सोपी गोष्ट नाही. पण त्याचवेळी, प्रत्येकजण या स्पर्धेत स्वत: सर्वोत्कृष्ट कामगिरी करू इच्छितो.’
नऊ संघांचा समावेश असलेल्या या लीगमध्ये सायना नॉर्थ इस्ट वॉरियर्सचे नेतृत्व करणार आहे. सुपर सिरीजसारखीच कामगिरी करण्यास खेळाडू पीबीएलमध्ये इच्छुक असतात का, असा प्रश्न सायनाला विचारण्यात आला होता. यावर सायना म्हणाली,‘पीबीएल अन्य स्पर्धेसारखी नसून सांघिक स्पर्धा आहे. यात खेळणे आनंददायी असते. आमच्यासाठी हा उत्सव आहे. या स्पर्धेमुळे युवा खेळाडूंना लाभ होतो शिवाय खेळाचा प्रचारदेखील होतो.’

Web Title: 'Court' dispute, Saina withdraws from national championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.