Coronavirus : टोकियो ऑलिम्पिक नियोजित वेळेवरच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2020 02:58 IST2020-03-15T02:57:01+5:302020-03-15T02:58:37+5:30
टोकियो ऑलिम्पिक नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी शनिवारी स्पष्ट केले

Coronavirus : टोकियो ऑलिम्पिक नियोजित वेळेवरच
टोकियो : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील विविध क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या असल्या तरी टोकियो ऑलिम्पिक नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी शनिवारी स्पष्ट केले.
कोरोनामुळे जगभरातील १,४०,००० हून अधिक लोक बाधित झाले आहेत. सुमारे ५,४०० लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, ही स्थिती आपत्कालीन असल्याचे आबे यांना वाटत नाही. ठरलेल्या वेळापत्रकानुसार जुलैमध्येच ऑलिम्पिक होईल, असे त्यांचे मत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑलिम्पिक एक वर्षासाठी पुढे ढकलावे, असे आवाहन केले होते.
आबे म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच यावर अधिकृत उत्तर दिले जाईल.