Commonwealth Games 2022: सुवर्ण सिंधू!; पी व्ही सिंधूने अखेर रौप्यपदकाची भिंत ओलांडली, भारतासाठी ऐतिहासिक पदकाची कमाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 02:45 PM2022-08-08T14:45:36+5:302022-08-08T14:45:56+5:30

Commonwealth Games 2022 PV Sindhu Gold :  ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही  सिंधूने (  P V Sindhu) अखेर सुवर्णपदक व तिच्यामध्ये असलेली भिंत ओलांडली

Commonwealth Games 2022 PV Sindhu Gold : P.V Sindhu wins GOLD medal, Sindhu beat WR 13 Michelle Li 21-15, 21-13 in Final, Its 1st CWG Gold medal for Sindhu (Earlier Silver in 2014 & Bronze in 2018) | Commonwealth Games 2022: सुवर्ण सिंधू!; पी व्ही सिंधूने अखेर रौप्यपदकाची भिंत ओलांडली, भारतासाठी ऐतिहासिक पदकाची कमाई 

Commonwealth Games 2022: सुवर्ण सिंधू!; पी व्ही सिंधूने अखेर रौप्यपदकाची भिंत ओलांडली, भारतासाठी ऐतिहासिक पदकाची कमाई 

Next

Commonwealth Games 2022 PV Sindhu Gold :  ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही  सिंधूने (  P V Sindhu) अखेर सुवर्णपदक व तिच्यामध्ये असलेली भिंत ओलांडली. तिला २०१४ व २०१८मध्ये महिला एकेरीच्या सुवर्णपदकाने सिंधूला हुलकावणी दिली होती. पण, २०२२मध्ये तिने अखेर पहिले सुवर्णपदक जिंकले. सायना नेहवालने २०१० व २०१८मध्ये महिला एकेरीचे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर महिला एकेरीत सुवर्ण जिंकणारी सिंधू ही दुसरी भारतीय महिला बॅडमिंटपटू ठरली.  सिंधूच्या या विजयाने भारताच्या सुवर्णपदकांची संख्या १९ झाली असून पदक तालिकेत आपण न्यूझीलंडला मागे सोडून चौथ्या क्रमांकावर सरकलो आहोत.

सिंगापूर व मलेशियन बॅडमिंटनपटूंना पराभूत करून सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे तिचे जिंकणे निश्चित मानले जातच होते. कॅनडाच्या मिशेल ली हिचा तिने मागील ६ सामन्यांत पराभव केला होता. सिंधूने नेट नजिकचा खेळ करताना गुण घेण्याचा डाव रचला आणि ३-१ अशी आघाडीमुळे तो यशस्वीही ठरताना दिसला. मिशेलला कोर्टवर सिंधूने व्यग्र ठेवले. सुरुवातीचा फटका मागे मारल्यानंतर दुसरा फटका नेट जवळ खेळून सिंधूने गुणसंख्या वाढती ठेवली. मिशेलने हळुहळू सामन्यात कमबॅक करण्यास सुरुवात केली आणि गेममध्ये ४-४ अशी बरोबरी घेतली. सिंधूचा डाऊन दी लाईन स्मॅश पाहण्यासारखा होता. सिंधूने ११-८ अशी आघाडी घेतली.


ब्रेकनंतर दोन्ही खेळाडूंचा खेळ उंचावलेला दिसला. दोघींमध्ये ३० फटक्यांची रॅली पाहताना चाहते सुखावले होते आणि सिंधूने ती रॅली जिंकून १५-९ अशी आघाडी वाढवली होती. सिंधूच्या प्रहारासमोर कॅनेडीयन खेळाडू कोर्टवर कोसळलेली दिसली. सिंधूने बॉडीलाईन स्मॅश मारत तिला हतबल केले. सिंधूने २१-१५ असा पहिला गेम घेतला. ( PV Sindhu takes the 1st game 21-15  ). मिशेलने दुसऱ्या गेममध्ये आक्रमक सुरुवात करताना गुण घेतले. सिंधूने यावेळेस चतुराई दाखवली अन् मिशेलच्या आक्रमणाला बचावात्मक खेळाने उत्तर देत चूका करण्यास भाग पाडले. मिशेलकडून चूका होत गेल्या अन् सिंधूने ११-५ अशी आघाडी घेतली. 


सिंधूने प्रतिस्पर्धी खेळाडूच्या प्रत्येक फटक्याला प्रत्युत्तर दिले आणि जबरदस्त चाललेल्या रॅलीत पुन्हा कॅनेडीयन खेळाडूला कोर्टवर लोटांगण घालायला लावले. दोघींमध्ये रॅलीचा सुरेख खेळ पाहायला मिळाला. सिंधूकडे १३-९ अशी होती. २३व्या गुणासाठी दोन्ही खेळाडूंमध्ये ५०+शॉट्सची रॅली रंगली अन् ती मिशेलने जिंकली. सिंधू थकलेली पाहायला मिळत होती आणि त्यामुळे भारतीय चाहत्यांची धाकधुक वाढली होती. सिंधूकडे १६-१२ अशी आघाडी होती, पण मिशेलच्या खेळाचा स्थर उंचावत चालला होता. सिंधूने दुसरा गेम २१-१३ असा जिंकून सुवर्णपदक नावावर केले.
 
डबल ऑलिम्पिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूने राष्ट्रकुल स्पर्धेत २०१८मध्ये मिश्र सांघिक गटाचे सुवर्णपदक जिंकले आहे. २०१८मध्ये तिला महिला एकेरीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. २०१४मध्ये तिने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले होते. २०२२मध्ये तिला मिश्र सांघिक गटाचे सुवर्णपदक कायम राखता आले नाही आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.


#Badminton भारताने बॅडमिंटनमध्ये सिंधूचं पदक वगळता १ रौप्य व दोन कांस्यपदकांची  कमाई केली आहे. पुरुष एकेरीत श्रीकांत किदम्बीने कांस्यपदकाच्या लढाईत सिंगापूरच्या जिआ हेंग तेहचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला. महिला दुहेरीच्या कांस्यपदकाच्या लढतीत जॉली त्रिसा व गायत्री गोपिचंद यांनी ऑस्ट्रेलियन जोडीचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला. मिश्र सांघिक गटात भारताला सुवर्णपदकाच्या सामन्यात मलेशियाकडून १-३  असा पराभव पत्करावा लागला. 

Web Title: Commonwealth Games 2022 PV Sindhu Gold : P.V Sindhu wins GOLD medal, Sindhu beat WR 13 Michelle Li 21-15, 21-13 in Final, Its 1st CWG Gold medal for Sindhu (Earlier Silver in 2014 & Bronze in 2018)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.