शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
4
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
5
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
6
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
7
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
8
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
9
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
10
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
11
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
13
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
14
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
15
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
16
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
17
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
18
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
19
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
20
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका

Commonwealth Games 2022 : लवलीना बोरगोहाईंचा धक्कादायक पराभव, भारताच्या सहा बॉक्सर्सनी पक्की केली पदकं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 10:24 PM

Commonwealth Games 2022 Boxing : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारतीय बॉक्सिंगपटूंनी तीन पदकं निश्चित केली आहे.

Commonwealth Games 2022 Boxing : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारतीय बॉक्सिंगपटूंनी तीन पदकं निश्चित केली आहे. सागर ( ९२+ किलो), जास्मिन ( ५७-६० किलो) व अमित पांघल ( ४८-५१ किलो) यांनी आपापल्या गटाची उपांत्य फेरी निश्चित करून किमान कांस्यपदक पक्के केले आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या लवलीना बोरगोहाईंचा पराभव हा धक्कादायक निकाल ठरला. आतापर्यंत भारताच्या सहा बॉक्सर्सनी पदक निश्चित केले आहे. काल नीतू, हुसैन मुहम्मद व निखत जहीरनने पदक पक्के केले होते.

#Boxing आशियाई पदक विजेत्या अमित पांघलने ४८-५१ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनचा ५-० असा सहज पराभव केला. उपांत्य फेरीत प्रवेश करून त्याने भारतासाठी यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील बॉक्सिंगमधील चौथे पदक पक्के केले. 

#Boxing जास्मिननेही ५७-६० किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत न्यूझीलंडच्या ट्रॉय गार्टनवर मात करून भारताचे आणखी एक पदक पक्के केले. ९२+ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत सागर अहलावतने सेयचेलेसच्या केडी एग्नेसवर ५-० असा विजय मिळवताना भारताचे आणखी एक पदक निश्चित केले.  

#Para Powerlifting : पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या लाईटवेट गटाच्या अंतिम फेरीत मनप्रीत कौरने तिच्या तीन प्रयत्नांपैकी दोनमध्ये ८७ व ८८ किलो भार उचलला. २०१८च्या आशियाई पॅरा स्पर्धेत ५० किलो वजनी गटात रौप्य आणि २०१४च्या राष्ट्रकुल स्पर्धेत पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या सकीनाचा ९० किलो उचलण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. पण, दुसऱ्या प्रयत्नात तिने ९० किलो भार उचलला, परंतु भारतीय खेळाडू पदक शर्यतीतून बाहेर राहिले.

#Badminton भारताच्या पी व्ही सिंधूने महिला एकेरीच्या राऊंड ऑफ ३२ मध्ये मालदिवच्या फातिमा नबाह अब्दुल रझ्झाकवर २१-४, २१ -११ असा विजय मिळवला. मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा/बी सुमिथ रेड्डी यांनी २१-१८, २१-१६ अशा फरकाने इंग्लंडच्या हेमिंग कॅलम/ पघ जेसिका यांचा पराभव केला. पुरुष एकेरीत श्रीकांत किदम्बीने २१-९, २१-९ असा सहज युगांडाच्या डॅनिएल वनगॅलियावर मात केली. 

#Athletics महिलांच्या हातोडाफेक स्पर्धेत मंजू बालाने ५९.६८ मीटर हातोडा फेकून अंतिम फेरीत प्रवेश पक्का केला. ५७.४८ मीटर लांब हातोडा फेकणारी सरिता सिंग १३ वी आली आणि तिला अंतिम फेरीत प्रवेश करता आला नाही. हिमा दासने महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत उपांत्यफेरी गाठली आहे. तिने २३.४२ सेंकदात हे अंतर गाठले. हिमा हिट-२ मध्ये अव्वल राहिली असून तिचा उपांत्यफेरीचा सामना अनुक्रमे ५ आणि ६ ऑगस्ट रोजी होईल.  #Squash महिला दुहेरीच्या लढतीत सारा कुरविल्ला व अनाहत सिंग या युवा खेळाडूंनी ११-९, ११-४ अशा फरकाने श्रीलंकेच्या येहेनी कुरूप्पू व चनिथ्मा सिनाली या जोडीवर विजय मिळवून आगेकूच केली. मिश्र दुहेरीत जोश्ना चिनप्पा व हरिंदर पाल सिंग संधू या अनुभवी जोडीला ऑस्ट्रेलियाच्या लॉबन डोना व कॅमेरून पिली यांच्याकडून ८-११,९-११ असा पराभव पत्करावा लागला.#Squash  सौरव घोषाल व दीपिका पल्लिकल या जोडीने विजयी सुरूवात करताना वेल्सच्या एमिली व्हाईटलॉक व पीटर क्रीड जोडीचा ११-८, ११- ४ असा पराभव केला. #TableTennis मनिका बात्रा/साथियन ज्ञानसेकरन या जोडीने ११-१, ११-३, ११-१ अशा फरकाने सेयचेलेसच्या मिक क्री व लॉरा सिनोनचा पराभव करून मिश्र दुहेरीच्या उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाboxingबॉक्सिंगLovelina Borgohainलव्हलीना बोरगोहाईं