सेमीफायनलसाठी क्लार्कला हवायं ऑस्ट्रेलियन चाहत्यांचा पाठिंबा
By Admin | Updated: March 23, 2015 17:21 IST2015-03-23T16:56:28+5:302015-03-23T17:21:21+5:30
सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय प्रेक्षक मोठ्या प्रमाणात सिडनीत दाखल होत असतानाच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने भारतीय पाठिराख्यांचा धसका घेतला आहे.

सेमीफायनलसाठी क्लार्कला हवायं ऑस्ट्रेलियन चाहत्यांचा पाठिंबा
ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २३ - सेमीफायनलमध्ये भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय प्रेक्षक मोठ्या प्रमाणात सिडनीत दाखल होत असतानाच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने भारतीय पाठिराख्यांचा धसका घेतला आहे. सिडनीतील सेमी फायनलसाठी ऑस्ट्रेलियन संघाच्या समर्थकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन क्लार्कने ट्विटरद्वारे केले आहे.
सोमवारी मायकल क्लार्कने ट्विटरवर ट्विटकरुन समर्थकांचा पाठिंबा मागितला आहे. गुरुवारी होणा-या सेमी फायनलसाठी ऑस्ट्रेलियन समर्थकांनी देशाचे झेंडे व संघाची जर्सी घालून जास्तीत जास्त संख्येने स्टेडियममध्ये उपस्थित राहावे असे क्लार्कने म्हटले आहे. सिडनी क्रिकेट मैदानात होणा-या सामन्यातील ७० टक्के तिकीटं ही भारतीय संघाच्या पाठिराख्यांनी विकत घेतल्याचा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या बहुसंख्य सामन्यांना भारतीय संघाला चांगला पाठिंबा मिळला होता.