Video : 'एकत्र खेळण्याचे आम्हाला फायदे'-ख्रिस्त‌िना आणि कॅमेला, समलिंगी असल्याचे जाहीर केलेली डॅनिश जोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2018 05:52 PM2018-01-06T17:52:11+5:302018-01-06T18:41:50+5:30

पीबीएलच्या या सत्रात डेन्मार्कच्या समलिंगी खेळाडू ख्रिस्तिना पेडरसन आणि कॅमेला रिटर जुल या सहभागी झाल्या आहेत.

Christinna Pedersen And Kamilla Rytter Juhl, reveal their relationship | Video : 'एकत्र खेळण्याचे आम्हाला फायदे'-ख्रिस्त‌िना आणि कॅमेला, समलिंगी असल्याचे जाहीर केलेली डॅनिश जोडी

Video : 'एकत्र खेळण्याचे आम्हाला फायदे'-ख्रिस्त‌िना आणि कॅमेला, समलिंगी असल्याचे जाहीर केलेली डॅनिश जोडी

Next
ठळक मुद्दे

आकाश नेवे/चेन्नई - पीबीएलच्या या सत्रात डेन्मार्कच्या समलिंगी खेळाडू ख्रिस्तिना पेडरसन आणि कॅमेला रिटर जुल या सहभागी झाल्या आहेत. आम्ही एकमेकांना समजून घेतो. त्यामुळे एकत्र खेळण्याचे फायदे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या वर्षी पीबीएलमध्ये खेळणे आम्हाला आवडत असल्याचे ख्रिस्तिना आणि कॅमेला यांनी सांगितले.

ख्रिस्तिना ही अवध वॉरीयर्सकडून खेळत आहे. तर कॅमेला रिटर झुल ही अहमदबाद स्मॅश मास्टर्स कडून खेळत आहे. ख्रिस्तिना म्हणाली, आम्ही एकमेकांना पाहताच क्षणी प्रेमात पडलो नाही. वेळ घेतला. नातेही काही काळ समाजापासून लपवुन ठेवले मात्र योग्य वेळ येताच आम्ही नात्याचा स्वीकार केला आणि समाजासमोर आणले देखील.

तुला ख्रिस्तिनाच्या स्वभावातील नेमक्या कोणत्या गोष्टी आवडतात. याबद्दल विचारले असता कॅमेला म्हणाली,’ ती खुप शांत आहे. खेळात नैसर्गिकता आहे. सुरूवातीपासून तीने मला समजून घेतले.’

यावर ख्रिस्तिना म्हणाली, तिचा स्वतःवर विश्वास आहे. मला वाटते आमच्यात कोर्टवर आणि बाहेरदेखील चांगला समन्वय आहे. दोघींना एकमेकांबद्दल काय आवडत नाही, असे विचारल्यावर दोघींनी एकाच सुरात ‘काहीच नाही’ असे उत्तर दिले.

ख्रिस्तिना पुढे म्हणाली की,’आम्हाला काही वेळा आमच्या नात्याविषयी नकारात्मक प्रतिक्रिया मिळतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य असते आम्ही प्रत्येक कमेंटला उत्तर देऊ शकत नाही.’

ख्रिस्तीना आणि कॅमेला यांनी २०१२,२०१४,२०१६ या वर्षी युरोपीयन चॅम्पियनशीप पटकावली आहे. तर २०१७ च्या विश्व चॅम्पियनशीपचे उपविजेतेपद पटकावले आहे. त्यांनी २०१५ मध्ये इंडोनेशियात देखील दुहेरीचे जेतेपद पटकावले आहे.


 

Web Title: Christinna Pedersen And Kamilla Rytter Juhl, reveal their relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा