बुद्धिबळ : हम्पी जगात तिसऱ्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 00:27 IST2019-10-04T00:26:32+5:302019-10-04T00:27:12+5:30
हम्पीने दोन वर्षांनंतर पुनरागमन करत अलीकडेच रशियात फिडे महिला ग्रांप्री जेतेपद पटकावले.

बुद्धिबळ : हम्पी जगात तिसऱ्या स्थानी
नवी दिल्ली : भारतीय स्टार महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीने जागतिक संघटना फिडेच्या नव्या क्रमवारीमध्ये तिसरे स्थान मिळवले. आंध्र प्रदेशच्या या ३२ वर्षीय खेळाडूने दोन वर्षांनंतर पुनरागमन करत अलीकडेच रशियात फिडे महिला ग्रांप्री जेतेपद पटकावले.
ग्रँडमास्टर हम्पीला यामुळे १७ इएलओ गुणांचा लाभ झाला. ती २५७७ गुणांसह तिसऱ्या स्थानी दाखल झाली. हम्पीने मुलगी अहानाच्या जन्मानंतर दोन वर्षांचा ब्रेक घेतला होता. चीनची हाऊ यिफान २६५९ गुणांसह अव्वल स्थानी असून चीनचीच ज्यू वेनजिन (२५८६) दुसºया स्थानावर आहे. खुल्या गटात दिग्गज विश्वनाथन आनंद २७६५ अंकांसह नवव्या स्थानी आहे.