शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

परिस्थितीनुसार क्रीडाधोरणात बदल गरजेचा- राही सरनोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 1:01 AM

राज्याचे क्रीडाधोरण एकदाच तयार होते, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईपर्यंत मैदान, घरची, शैक्षणिक जीवनातील परिस्थिती सतत बदलत असते.

पुणे : राज्याचे क्रीडाधोरण एकदाच तयार होते, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईपर्यंत मैदान, घरची, शैक्षणिक जीवनातील परिस्थिती सतत बदलत असते. त्याला कोणत्यावेळी कोणते सहकार्य लागेल, कोणीच सांगू शकत नाही. क्रीडाधोरण एकदाच तयार होते. नंतर ते अनेक वर्षे अमलात येते आणि त्या अनुषंगाने क्रीडाखाते चालते. काळानुसार धोरणात बदल करणे आवश्यक असल्याचे मत आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णकन्या राही सरनोबतने व्यक्त केले.जकार्ता-इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रीड स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या पदकविजेत्या खेळाडूंचा पारितोषिक वितरण समारंभ क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मंगळवारी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये पार पडला, त्यावेळी राही बोलत होती.राही म्हणाली, की शूटिंग खेळासाठी मागील १२ वर्षे क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून राज्य शासनाने मला मदत केलेली असल्यामुळे, मी हा खेळ सुरू ठेवू शकले. याशिवाय तिने शिवछत्रपती क्रीडा संकुल स्पोटर््स सायन्स सेंटर अद्ययावत करून, त्या ठिकाणी तज्ज्ञ व्यक्तींची सेवा उपलब्ध करून दिल्यास राज्यतील सर्व खेळाडूंना नक्की त्याचा फायदा होईल, असे नमूद केले.यावेळी क्रीडामंत्री विनोद तावडे म्हणाले, की युवा पिढीने मोबाईल आणि सोशल मीडियामधून बाहेर येणे गरजेचे आहे. जेव्हा युवा पिढी बाहेर येऊन मैदानावर उतरेल, तेव्हा खरे क्रीडाधोरणाचे उद्दिष्ट पूर्ण होईल.यावेळी सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूस ५० व त्यांच्या मार्गदर्शकास १२ लाख, रौप्यपदक प्राप्त करणाºया खेळाडूस ३० व त्यांच्या मार्गदर्शकास ७ लाख व कांस्यपदक प्राप्त करणाºया खेळाडूस २० व त्यांच्या मार्गदर्शकास ५ लाख रुपये देऊन गौरविण्यात आले. यावेळी राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार उपस्थित होते. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच क्रीडाप्रेमी व युवक सेवा संचालनालयामधील अधिकारी उपस्थित होते.महाराष्ट्राच्या राही जीवन सरनोबत, कोल्हापूर व त्यांचे मार्गदर्शक रौनक अशोक पंडित, दत्तू बबन भोकनळ, नाशिक व मार्गदर्शक अश्विनी कुंडलिक बोºहाडे, सायली संजय केरीपाळे, पुणे व मार्गदर्शक राजेश ढमढेरे, सोनाली विष्णू शिंगटे, मुंबई व मार्गदर्शक राजेश राजाराम पाडावे, श्वेता प्रभाकर शेरवेगार, मुंबई व मार्गदर्शक अमिश वेद, वर्षा गौतम व मार्गदर्शक अमिश वेद, रिशांक कृष्णा देवाडिगा, मुंबई व मार्गदर्शक सुनील मारुती अडके, गिरीश मारुती इरनक, ठाणे व मार्गदर्शक संतोष हरिभाऊ पडवळ, हीना सिद्घू, मुंबई व मार्गदर्शक रौनक अशोक पंडित, महेश मानगावकर, मुंबई व मार्गदर्शक मृणाल रॉय यांना गौरविण्यात आले.

टॅग्स :Rahi Sarnobatराही सरनोबत