दोन पावलांवर मौका!
By Admin | Updated: March 20, 2015 02:21 IST2015-03-20T02:21:38+5:302015-03-20T02:21:38+5:30
बांगलादेशविरोधात उपांत्यपूर्व फेरीचा पेपर डिस्टिंग्शनसह पास करून टीम इंडियाने वर्ल्डकपची सेमिफायनल गाठली. आता वर्ल्ड जिंकण्याचा ‘मौका’ सेमी आणि फायनल अशा दोन पावलांवर येऊन ठेपला आहे.

दोन पावलांवर मौका!
बांगलादेशविरोधात उपांत्यपूर्व फेरीचा पेपर डिस्टिंग्शनसह पास करून टीम इंडियाने वर्ल्डकपची सेमिफायनल गाठली. आता वर्ल्ड जिंकण्याचा ‘मौका’ सेमी आणि फायनल अशा दोन पावलांवर येऊन ठेपला आहे. आॅस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान या शुक्रवारच्या सामन्यात जो विजयी होईल त्या संघासोबत टीम इंडियाला दोन हात करावे लागतील. त्या सामन्याकडे भारतीय चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
07 सामन्यांत प्रतिस्पर्ध्याला आॅलआउट करण्याचा विक्रम. ‘वन-डे’त अशी कामगिरी करणारा पहिलाच संघ ठरला.
11वर्ल्डकप सामने सलग जिंकण्याचा टीम इंडियाचा विक्रम.
17विकेट्स घेणारा मोहम्मद शमी हा या वर्ल्डकपमधील ‘टॉप’ बॉलर ठरला.
...आणि डाव सावरला
चौथ्या गड्यासाठी रोहीत शर्माने १५.५ षटकांत सुरेश रैनासोबत १२२ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी टीम इंडियासाठी मोलाची ठरली. शिवाय रैनाने तडकावलेल्या ६५ धावा रनरेट वाढवण्यास पूरक होत्या.
‘तो’ निर्णय बांगलादेशच्या जिव्हारी!
च्बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाच्या ४० षटकांमध्ये केवळ १९६ धावा स्कोअरबोर्डवर होत्या. रोहीत शर्मा ९० धावांवर खेळत होता. त्याचवेळी रोहीतने फुलटॉसवर मारलेला चेंडू थेट डीम मिडविकेटवरच्या फिल्डरच्या हाती गेला. भारतीय चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता, तर बांगलादेशसाठी आनंदाचा क्षण. मात्र लेग अंपायरने तो ‘नो बॉल’ असा चुकीचा निर्णय दिला आणि रोहीत वाचला. हा निर्णय बांगलादेशच्या चांगलाच जिव्हारी लागला.
तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध आॅस्ट्रेलिया लढत होईल. घरच्या मैदानावर यजमान संघाला चीत करण्याचे अवघड आव्हान पाकपुढे असेल.