शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमाराच्या मुलाने साधला ‘मिशन ऑलिम्पिक’ कुस्तीत सुवर्णडाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 17:42 IST

मलेशियाच्याच पैलवानास चारीमुंड्या चीत करून सुवर्णपदक खेचून आणले

मायणी : खटाव तालुक्यातील मायणी येथील मच्छीमाराचा मुलगा पैलवान चैतन्य साळुंखे याने ७९ किलो वजनी गटामध्ये थायलंड येथे झालेल्या मिशन ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करून आंतरराष्ट्रीय फ्री स्टाइल चॅम्पियन कुस्ती स्पर्धेमध्ये डाव साधून सुवर्णपदक प्राप्त केले आहे, तसेच पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी एक आशेचा किरण निर्माण करून देशाचे व गावचे नाव अटकेपार नेले आहे.मायणीचा सुपुत्र पैलवान चैतन्य मच्छिंद्र साळुंखे याने वयाच्या १५ व्या वर्षापासून कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्यास प्रारंभ केला. त्याने यापूर्वी तालुका व जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक, तर राज्य पातळीवरील कुस्ती स्पर्धेत त्याने रजत पदक प्राप्त केले आहे. देशांतर्गत बेळगाव येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ७९ किलो वजन गटात सुवर्ण व सन २०२४ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ६५ किलो वजन गटात सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

थायलंड येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत त्याने कझाकिस्तान व उज्बेकिस्तान या देशातील पैलवानांचा पराभव करून अखेरच्या कुस्तीत मलेशियाच्याच पैलवानास चारीमुंड्या चीत करून सुवर्णपदक खेचून आणले.पैलवान चैतन्यचे शिक्षण मायणी येथील प्राथमिक शाळा व भारत माता विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे झाले असून, तो सध्या बारावीमध्ये कला शाखेत शिक्षण घेत आहे. वडील मच्छिंद्र साळुंखे हे मच्छीमारीचा व्यवसाय करून प्रपंच चालवितात. अत्यंत आर्थिक अडचणीची परिस्थिती असतानादेखील त्यांनी यावर मात करून आपल्या मुलाला पैलवान बनवण्यात मोलाचा वाटा उचलला.

शासनाने कुस्तीच्या खेळास चालना व प्रेरणा द्यावी..राज्य शासनानेही या उत्कृष्ट व कौतुकास्पद कामगिरीचे कौतुक करून त्याचा सत्कार करावा व त्याच्या पुढील शिक्षणाची व कुस्ती कारकिर्दीची जबाबदारी उचलून त्याच्या कुस्तीच्या खेळास चालना व प्रेरणा द्यावी, अशा अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

मिशन ऑलिम्पिकनंतर अजून एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा होणार असून, या स्पर्धेत असेच यश मिळाल्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र होईन. - चैतन्य साळुंखे, पैलवान

English
हिंदी सारांश
Web Title : Fisherman's Son Wins Gold in 'Mission Olympic' Wrestling!

Web Summary : Chaitanya Salunkhe, son of a fisherman, secured a gold medal at the 'Mission Olympic' wrestling competition in Thailand. Representing India, he defeated wrestlers from Kazakhstan, Uzbekistan, and Malaysia. This victory boosts his chances for the upcoming Olympics, bringing pride to his village.