शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटमध्ये शतकांचा वर्षाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2015 01:46 IST

वर्ष २०१५ मध्ये आतापर्यंत केवळ सात महिन्यांचा कालावधी झाला असला तरी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वन-डे शतकांचा विश्वविक्रम नोंदवल्या गेला आहे.

नवी दिल्ली : वर्ष २०१५ मध्ये आतापर्यंत केवळ सात महिन्यांचा कालावधी झाला असला तरी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वन-डे शतकांचा विश्वविक्रम नोंदवल्या गेला आहे. श्रीलंकेतील हंबनतोता येते रविवारी पाकिस्तान व श्रीलंका संघादरम्यान खेळल्या गेलेल्या पाचव्या व अखेरच्या वन-डे लढतीत श्रीलंकेचा फलंदाज कुशल परेराने शतक झळकावित संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. परेराचे शतक यंदाच्या कॅलेंडर वर्षांत ८० वे वन-डे शतक असून हा एक नवा विक्रम आहे. केवळ १०१ वन-डे सामन्यांत या शतकांची नोंद झाली. एका कॅलेंडर वर्षांत हे सर्वाधिक शतके आहे. यापूर्वी २०१४ मध्ये एकूण ७९ शतके नोंदवल्या गेली. यापूर्वी २०१३ मध्ये वन-डे शतकांची संख्या ७७ होती तर २००७ मध्ये एकूण ७५ शतके नोंदवल्या गेली होती. यंदाच्या कॅलेंडर वर्षात शतके झळकाविण्यात श्रीलंकेच्या फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. त्यांनी ८० पैकी एकूण १३ शतके झळकावली. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड या संघांचा समावेश आहे. या संघांच्या फलंदाजांनी प्रत्येकी ११ शतके ठोकली. भारत व इंग्लंडच्या फलंदाजांनी यंदाच्या कॅलेंडर वर्षांत प्रत्येकी ८ शतके झळकावली तर बांगलादेश व आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या नावावर प्रत्येकी ६ शतकांची नोंद आहे. पाकिस्तान व झिम्बाब्वेतर्फे प्रत्येकी ५ शतकांची नोंद झाली आहे तर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी तीन शतके झळकावली. आयर्लंडतर्फे दोन शतकांची नोंद झाली असून स्कॉटलंड व संयुक्त अरब अमिरात संघातर्फे प्रत्येकी एक शतक नोंदवल्या गेले. २०१५ मध्ये श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकाराने सर्वाधिक ५ शतके ठोकले. त्यातील चार शतके विश्वकप स्पर्धेत नोंदविल्या गेली. श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने चार शतके ठोकली. इंग्लंडचा जो रुट, दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला, न्यूझीलंडचा केन विलियम्सन आणि रॉस टेलर यांनी या कालावधीत प्रथ्येकी तीन शतके नोंदवली. भारतातर्फे रोहित शर्मा व शिखर धवन यांनी प्रत्येकी दोन शतके ठोकली. यंदाच्या मोसमात दोन द्विशतकाची नोंद झाली आहे. न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील (नाबाद २३७) आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल (२१५) यांनी द्विशतक ठोकण्याची कामगिरी केली. (वृत्तसंस्था)