'कॅथॉलिक-श्री' शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार ७ ऑक्टोबरला रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 18:10 IST2018-10-05T18:02:19+5:302018-10-05T18:10:42+5:30

या स्पर्धेसाठी एकूण ६५ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक गटासाठीही बक्षिस देण्यात येणार आहे.

'Catholics-Shree' bodybuilding competition will be on 7th October | 'कॅथॉलिक-श्री' शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार ७ ऑक्टोबरला रंगणार

'कॅथॉलिक-श्री' शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार ७ ऑक्टोबरला रंगणार

सावंतवाडी : भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या मान्यतेने सावंतवाडी येथे कॅथॉलिक-श्री या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ७ ऑक्टोबर रोजी आर.पी.डी. हायस्कूल (सावंतवाडी) येथे रंगणार आहे.

या स्पर्धेमध्ये पाच गट ठेवण्यात आले आहेत. यामध्ये ५५ किलोपर्यंत, ५५-६०, ६०-६५, ६५-७० आणि ७०  किलोवरील, असे गट असतील. त्याचबरोबर या स्पर्धेत मेन फिजिक, या विभागातही शरीरसौष्ठवपटू सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेसाठी एकूण ६५ हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक गटासाठीही बक्षिस देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी निशिकांत तोरस्कर (9422596050) किंवा सुधीर हळदणकर (9158625598) यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: 'Catholics-Shree' bodybuilding competition will be on 7th October