ब्राव्होच्या आगमनामुळे ताकद वाढली : धोनी
By Admin | Updated: September 16, 2014 01:39 IST2014-09-16T01:39:11+5:302014-09-16T01:39:11+5:30
इंडियन प्रीमिअर लीगच्या गत सत्रत ड्वॅन ब्राव्होच्या दुखापतीचा फटका चेन्नई सुपर किंग्जला चांगलाच बसला होता. दुखापतीमुळे ब्राव्होने स्पध्रेतून माघार घेतली आणि संघाचा संतुलन बिघडला होता.

ब्राव्होच्या आगमनामुळे ताकद वाढली : धोनी
हैदराबाद : इंडियन प्रीमिअर लीगच्या गत सत्रत ड्वॅन ब्राव्होच्या दुखापतीचा फटका चेन्नई सुपर किंग्जला चांगलाच बसला होता. दुखापतीमुळे ब्राव्होने स्पध्रेतून माघार घेतली आणि संघाचा संतुलन बिघडला होता. 17 सप्टेंबरपासून सुरू होणा:या चॅम्पियन्स लीग टी-2क् स्पध्रेत ब्राव्होला पुन्हा पिवळय़ा जर्सीत पाहता येणार असल्याने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भलताच आनंद झाला आहे. तो म्हणाला, आमच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. दुखापतीमुळे ब्राव्होने आयपीएलमधून माघार घेतली होती आणि त्याची उणीव आम्हाला जाणवली होती. त्यामुळे संघाचे संतुलन बिघडले होते. त्याच्या कमबॅकने आम्हाला फायदा होईल.
चॅम्पियन लीग स्पध्रेचा पहिला मुकाबला बुधवारी चेन्नई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा रंगणार आहे. संघातील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्थरावर खेळत असून तेथे त्यांची कामगिरी चांगली झालेली आहे. त्यामुळे संघ संतुलित वाटतोय. तरीही येथील खेळपट्टीशी लवकर जुळवून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे धोनी म्हणाला. केकेआर संघाविषयी त्याला विचारले असता तो म्हणाला, केकेआर हा चांगला संघ आहे. आम्ही एकमेकांविरुद्ध अनेकदा खेळलो आहोत. त्यामुळे संघातील बारकावे आम्हाला माहित आहेत. (वृत्तसंस्था)