Mary Kom : भारताला मोठा धक्का, मेरी कोमची दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार; हॉस्पिटलमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 18:14 IST2022-06-10T18:13:39+5:302022-06-10T18:14:11+5:30

Mary Kom out of CWG selection trail - ऑलिम्पिक मेडलिस्ट बॉक्सर मेरी कोमला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी होणाऱ्या निवड चाचणी स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे

BREAKING: Mary Kom out of CWG selection trail after a left knee injury during the first round of her bout against Nitu in the 48 kg category | Mary Kom : भारताला मोठा धक्का, मेरी कोमची दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार; हॉस्पिटलमध्ये दाखल

Mary Kom : भारताला मोठा धक्का, मेरी कोमची दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार; हॉस्पिटलमध्ये दाखल

Mary Kom out of CWG selection trail - ऑलिम्पिक मेडलिस्ट बॉक्सर मेरी कोमला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी होणाऱ्या निवड चाचणी स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. ४८ किलो वजनी गटातील पहिल्या फेरीत नितू विरुद्धच्या सामन्यात मेरीच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आणि तिला सामना अर्ध्यावरच सोडावा लागला. सहा वेळा विश्वविजेती ठरलेल्या मेरीला आता पुढील  महिन्यात बर्मिंगह‌ॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेता येणार नाही.

हरयाणाच्या नितूने चाचणी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. २०१८मध्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या ३९ वर्षीय मेरीने दुखापत झाली असूनही काही काळ सामन्यात संघर्ष दाखवला, परंतु तिला संतुलन राखणे अवघड होत होते. त्यामुळे तिला रिंगमधून स्ट्रेचवरून न्यावे लागले आणि रेफरीने नितूला विजयी घोषित केले. मेरीला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे.    


 
 

Web Title: BREAKING: Mary Kom out of CWG selection trail after a left knee injury during the first round of her bout against Nitu in the 48 kg category