सुशांत सिंग राजपूतचा मित्र अन् दिग्गज बॉक्सरवर कोसळला दुःखाचा डोंगर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 11:07 IST2020-07-03T11:06:25+5:302020-07-03T11:07:28+5:30

क्रीडा विश्वालाही चटका देणारे वृत्त समोर येत आहे.

Boxer Amir Khan pays emotional tribute following tragic death of newborn nephew | सुशांत सिंग राजपूतचा मित्र अन् दिग्गज बॉक्सरवर कोसळला दुःखाचा डोंगर!

सुशांत सिंग राजपूतचा मित्र अन् दिग्गज बॉक्सरवर कोसळला दुःखाचा डोंगर!

बॉलिवूडसाठी 2020 हे वर्षे खूप वाईट आहे. एकानंतर एक कलाकारांच्या निधनाच्या वृत्तांमुळे सर्वांना धक्का बसला आहे. नुकतेच झालेल्या अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर शुक्रवारी प्रसिद्ध कोरियोग्राफर सरोज खान यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्व कलाकारांना धक्का बसला आहे. कार्डियक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. त्यात आता क्रीडा विश्वालाही चटका देणारे वृत्त समोर येत आहे. प्रसिद्ध बॉक्सर आमिर खान आणि त्याच्या कुटुंबीयांवर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

आमिर खान हा सुशांत सिंग राजपूतचा चांगला मित्र होता आणि त्याच्या निधनानंतर त्यानं भावनिक पोस्ट लिहिली होती. आमिरच्या घरात काही दिवसांपूर्वी लहान बाळाचा जन्म झाला होता आणि त्यांचा हा आनंद क्षणिक ठरला. आमिरच्या भावाच्या मुलाचे निधन झाले. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय दुःखात आहेत. आमिरने भाच्याला अखेरचा निरोप देणारा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली.


आमिरनं लिहिलं की,''माझ्या कुटुंबीयांसाठी हा आव्हानात्मक दिवस आहे. माझा भाऊ हरून खान याचा मुलग्याचं गुरुवारी निधन झालं. नवीन बाळाला आमच्यासोबत जास्त दिवस राहता आले नाही. त्याच्या जाण्यानं आम्हा सर्वांना मोठा धक्का बसला आहे. या कठीण काळात कुटुंबीयांना विशेषतः त्याची आई आणि वडिलांना ईश्वराने आधार द्यावा ही प्रार्थना.''
आमिरचा भाचा अब्दुल खान यानं जन्मानंतर लगेचच जगाचा निरोप घेतला. अब्दुलचे वडिल हारून हेही बॉक्सर होते आणि 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेत त्यानं कांस्यपदक जिंकलं होतं.   
 

Fact check: चीनला विरोध करणाऱ्या हाँगकाँगच्या आंदोलकांमध्ये खरंच दिसले का किम जोंग-उन?

ENGvsWI : इंग्लंड संघावर कोरोना संकट? खेळाडूची प्रकृती अचानक बिघडली, झाला सेल्फ आयसोलेट 

Web Title: Boxer Amir Khan pays emotional tribute following tragic death of newborn nephew